तुनिषाच्या आईचा शिझान खानवर मोठा आरोप

तुनिषाच्या आईचा शिझान खानवर मोठा आरोप

मुंबई :टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली. तुनिषाच्या आत्महत्येने आता एकच खळबळ उडाली आहे. तिच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे. याप्रकरणी तुनिषाचा प्रियकर शिझान खानला पोलिसांनी अटक केली आहे. आता तुनिषाच्या आईचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तिची आई शिझानवर आरोप करताना दिसत आहे.

तुनिषाची आई वनिता शिझानवर आरोप करताना म्हणाल्या, “त्याने माझ्या मुलीला लग्न करण्याचे आमिष दाखवले. तो आधीच एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये असताना तुनिषासोबत रिलेशनशिपमध्ये राहिला. त्यानं तिचा तीन ते चार महिने वापर केला. मला फक्त इतकंच सांगायचं आहे की शिझानला शिक्षा मिळालीच पाहिजे.

शिझानला असचं सोडू नका. मी माझं मूल गमावलं आहे.” पुढे त्या मीडियाचे आभार मानत म्हणाल्या की मीडिया मला सतत मदत करत आहे.दरम्यान, तुनिषा आणि शिझान विषयी आणखी एक माहिती समोर आली आहे की 15 दिवसांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला होता. त्यामुळे ती अस्वस्थ आणि डिप्रेशनमध्ये होते, असे म्हटले जात आहे.

पोलिसांचे महत्वपूर्ण खुलासे
तुनिषाच्या मृत्यूनंतर रात्री उशिरा तिचे पोस्टमॉर्टम पूर्ण झाले. या संदर्भात पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अभिनेत्री तुनिषा शर्माचा मृत्यू प्रामुख्याने श्वास गुदमरल्यामुळे झाला आहे. तुनिषा गरोदर असल्याच्या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नाही. तसेच तुनिषाच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखमी आढळलेली नाही, असेही यात म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube