UIThe Movie: साऊथचा स्टार उपेंद्रने ‘UI’ चे शूटिंग केले पूर्ण; ‘या’ दिवशी होणार टीझर प्रदर्शित
UIThe Movie: साऊथचा स्टार ‘उपेंद्र’ (Upendras) हा जगातील सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक मानला जातो. (Social media) आता त्याने त्याच्या ‘UI’ या नवीन सिनेमाचे शूटिंगचे काम पूर्ण झाले आहे. हा त्याचा बहुप्रतिक्षित प्रोजेक्ट आहे. या सिनेमात तो अभिनयाबरोबरच दिग्दर्शनाची देखील धुरा सांभाळली आहे. लाहारी फिल्म्स, जी मनोहरन आणि व्हीनस एंटरटेनर्स, केपी श्रीकांत यांनी या भव्य सिनेमाची निर्मिती केली आहे, आणि नवीन मनोहरन सह-निर्माते आहेत.
आता सिनेमाचे पोस्ट प्रोडक्शन सुरू झाले आहे. उपेंद्रने त्याच्या पहिल्या बीटीएस अपडेट व्हिडिओद्वारे टीझर आणि ट्रेलर रिलीज करण्यावर काही प्रश्नचिन्ह निर्माण करत वाद सुरू करण्यात आला होता. टीझर आणि ट्रेलर प्रेक्षकांची दिशाभूल करू शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. हा प्रश्न इंडस्ट्रीत, प्रेक्षक आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये नक्कीच चर्चेचा विषय बनला होता.
त्याच्या चाहत्यांच्या प्रचंड प्रेमामुळे हिट-मेकर ‘उपेंद्र’ ने उर्वशी थिएटर, बेंगळुरू येथे त्याचा बहुप्रतिक्षित ‘UI’ टीझर रिलीज करण्यास सहमती दर्शवली आहे. 18 सप्टेंबर दिवशी त्याच्या वाढदिवसाला त्याच्या चाहत्यांना भेट म्हणून हा टीझर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
Rajinikanth: ‘जेलर’ यशानंतर थलायवाच्या ‘या’ नव्या सिनेमाची घोषणा
या सिनेमात उपेंद्र हा मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहे. तसेच त्याच्यासोबत अभिनेत्री रेश्मा नानय्या, निधी सुब्बय्या, मुरली शर्मा आणि पी रविशंकर प्रमुख भूमिकेत आहेत आणि अजनीश लोकनाथ कंथारा फेम यांचे संगीत, शिव कुमार यांचे कला दिग्दर्शनाचू धुरा सांभाळणार आहेत. हा अभिनेता, चित्रपट निर्माता, निर्माता, पटकथा लेखक आणि राजकारणी म्हणून याची ओळख आहे. जो कायम कन्नड चित्रपटांमध्ये काम करतो. उपेंद्रने काही तेलुगू चित्रपटांमध्ये देखील काम केल्याची माहिती आहे.