उर्फी जावेद मुलगी नसून एक तृतीयपंथी…’या’ अभिनेत्याचा दावा

उर्फी जावेद मुलगी नसून एक तृतीयपंथी…’या’ अभिनेत्याचा दावा

मुंबई : आपल्या ड्रेसिंग स्टाईलसाठी तसेच हटके लूकसाठी प्रसिद्ध असलेली उर्फी जावेद(Urfi Javed) नेहमीच काहीना काही कारणामुळे चर्चेत राहते. तिचे कपडे तिची वेगळी ओळख करून देतात. तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे ती ट्रोल देखील होते. दरम्यान आता उर्फी बाबत एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. उर्फी बाबत एक खळबळजनक दावा एका अभिनेत्याने केला आहे. उर्फी जावेद ही मुलगी नसून ती एक तृतीयपंथी आहे असा दावा करण्यात आला आहे. अभिनेता फैजान अन्सारी (Actor Faizan Ansari) याने हे धक्कादायक विधान केलं आहे.

Urfi Javed_23

Urfi Javed_23

काय दावा केला आहे फैजानने?
फैजानने म्हंटले आहे की, उर्फी जावेद ही मुलगी नसून तृतीयपंथी आहे. आपण जे काही बोलतो आहे याबाबतचे पुरावे देखील आपल्याकडे आहे. तसेच वेळ पडल्यास यासगळ्या गोष्टी मी न्यायालयात देखील सादर करत सिद्ध करू शकतो. दरम्यान फैजाननं केलेल्या दाव्यामुळे उर्फीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

बावनकुळे हे वर्षभर घरीच जाणार नाहीत; हर्षवर्धन पाटलांनी सांगितले नियोजन

दरम्यान, अभिनेता फैजान अन्सारी व उर्फी यांच्यामध्ये नेहमीच वाद हा पेटलेला दिसून येत असतो. फैजान हा नेहमी उर्फीच्या कपड्यांवरून तिच्यावर निशाणा साधतो. त्याने उर्फीविरोधात तक्रार देखील दाखल केली होती. उर्फीमुळे समाजाच्या नजरा बदलत आहेत. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या जात असल्याचं त्याने म्हणून दाखवलं होतं.

Big Breaking! भिंगार कॅंन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर महापालिकेत जाणार?

उर्फी आणि वाद…
काही दिवसांपूर्वीच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या ड्रेसिंग पद्धतीमुळे तिच्यावर निशाणा साधला होता. दरम्यान वाघ यांच्या आव्हानाला उर्फीने देखील चांगलेच प्रत्युत्तर दिले. वाघ यांनी उर्फी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी केली. वाघ यांच्या प्रत्येक हल्ल्याला उर्फीने पलटवून लावले. एवढं सगळं झालं मात्र तिने आपले चित्र विचित्र कपड्यांची स्टाईल काही केल्या बदलली नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube