Urfi Javed : ‘या’ सत्कार्यासाठी उर्फी झाली होती वेटर; वाचा वेट्रेसिंग व्हिडिओची खास गोष्ट!

Urfi Javed : ‘या’ सत्कार्यासाठी उर्फी झाली होती वेटर; वाचा वेट्रेसिंग व्हिडिओची खास गोष्ट!

Urfi Javed : आपल्या वेगवेगळ्या फोटोसेशनमुळे नेहमीच चर्चेत असणारी उर्फी जावेद (Urfi Javed) आता पुन्हा एकदा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. यावेळी थेट मुंबईतील रिस्टोबार द नाईस या हॉटेलमध्ये वेटर बनल्याची दिसून आली. यानंतर नेटकार्‍यांना देखील आश्चर्य वाटलं. वेगवेगळ्या ड्रेसेसमुळे चर्चेत असलेली उर्फी अगदी फॉर्मल ड्रेसमध्ये वेटरच काम करत असल्याने सर्वांनाच प्रश्न पडला होता. मात्र आपण हे वेटरच काम का करत होतो याचं कारण उर्फिने आता सांगितला आहे.

फ्रान्सवरुन 276 प्रवाशांना घेऊन विमान मुंबईत दाखल; पण 27 प्रवासी तिथेच का थांबले?

वेटर बनून तिने लोकांना प्रेमाने जेवण सर्व्ह केलं लोकासोबत आपुलकीने गप्पा मारल्या आणि त्यांचा हा खास वेळ तिने तिच्या वेटर सर्व्हिस ने स्पेशल केला. वेटर बनल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. आज तिने इंस्टाग्रामवर तिच्या ही खास गोष्ट उघड करताना सांगितलं तिने कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनसाठी निधी उभारण्यासाठी वेट्रेस होण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओला कॅप्शन तिने दिले आहे:

राम मंदिर लोकार्पणाला गिरीश महाजन जाणार का? ठाकरे गटाचा खोचक सवाल

“स्वप्न साकार झालं! कोणतेही काम मोठे किंवा लहान नसते. ते सर्व दृष्टीकोनावर अवलंबून असते. मला एक तास वेट्रेस म्हणून काम करायचं होत आणि कॅन्सर पेशंट एड असोसिएशनमध्ये निधी देण्यासाठी मी ही हक्काची कमाई केली. यांना हे घडवून आणल्याबद्दल त्यांचे खूप आभार.’असं म्हणत तिने या पोस्टमध्ये या हॉटेलचे आभार मानले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

मीडिया सेन्सेशन आणि फॅशन आयकॉन असलेल्या तिला नोकरीतील आव्हाने समजून घेण्यासाठी वेट्रेस बनायचे होत आणि तिने जेवण करणाऱ्यांनी वेटिंग कर्मचार्‍यांशी उद्धटपणे वागताना पाहिले असले तरी त्या रात्रीचे पाहुणे तिच्याशी आणि हॉटेल मधल्या कर्मचार्‍यांशी खूप छान वागत होते. तिने काही टिप्स घेतल्या ज्या ती आता कर्करोगाच्या रुग्णांना मदत करण्यासाठी देणार आहे.

ट्रेलब्लेझर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उर्फी जावेदचे हे पाऊल अनेकांना प्रेरणा देऊन जाणार आहे. तिला या ख्रिसमसमध्ये काहीतरी अर्थपूर्ण करायचे होत आणि सिक्रेट संता बनून लोकांना मदत करायची होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube