Urfi Javed ला करायचं ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याशी लग्न, थेट घातली मागणी
नवी मुंबई : बिग बॉस फेम उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या कमी कपड्यातील पेहरावावरुन प्रसिद्ध आहे. यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि उर्फीमध्ये काही दिवस वाद देखील रंगला होता. उर्फी नुकतीच मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचली होती.
यावेळी तिने थेट बॉलीवूड अभिनेत्यालाच लग्नाची मागणी घातली. ती म्हणाली ‘मला तुझी दुसरी बायको बनव’ यानंतर तिचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
उर्फीला रेस्टॉरंटमध्ये पोहोचल्यावर पापाराझींनी पठाण (Pathan) संबंधीत काही प्रश्न विचारले. त्यासोबतच चित्रपटाला बॉयकॉट करत आहेत त्या लोकांना काय बोलणार? असं देखील विचारलं.
यावर उत्तर देत उर्फी म्हणाली, ‘मला बॅन करा, पण शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) चित्रपट पाहा.
त्यानंतर शाहरुख खानसाठी काय सांगशील असं विचारता उत्तर देत उर्फी म्हणाली, ‘शाहरुख खान माझं तुझ्यावर प्रेम आहे. कृपया मला तुझी दुसरी पत्नी बनव.’ आता उर्फीचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून नेटकरी तिच्या या विधानावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.
शाहरुख खान चार वर्षांनंतर ‘पठाण’मधून मोठ्या पडद्यावर परतला आहे. २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५५ कोटींची कमाई करून इतिहास रचला.
या चित्रपटाने गेल्या तीन दिवसांत जगभरात 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ने अवघ्या तीन दिवसांत वर्ल्डवाईड 220 कोटींचा टप्पा पार केला आहे.
चित्रपटाने तिसऱ्या दिवशी भारतात 34. 50 कोटींचा गल्ला जमवला आहे. यासोबतच चित्रपटाने भारतात अवघ्या तीन दिवसांत एकूण 150 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
पठाण चित्रपट शंभर पेक्षा अधिक देशांमध्ये आणि 2500 पेक्षा जास्त स्क्रीनवर रिलीज करण्यात आला आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट आणखी काय कमाल करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.