Uorfi Javed : माफी मागत, उर्फी म्हणाली कपड्यांची स्टाईल बदलणार, नेटकरी झाले चकित

Urfi Javed इंस्टाग्राम बंद करणार; पोस्ट करत स्वतःच सांगितलं कारण...

मुंबई : नेहमीच तिच्या हॉट आणि बिंधास्त लुकमुळे सोशल मिडीयावर तूफान आणणारी उर्फी जावेदने एक ट्विट करत नेटकऱ्यांना धक्का दिला आहे. उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे नेहमीच बातम्यांमध्ये झळकते. त्याचबरोबर तिच्या याच कपड्यांमुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका आणि वाद देखील निर्माण झाल्याचं अनेकदा पाहायला मिळत.

गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यामध्ये चांगलचं ट्विटर वॉर रंगल होतं. अनेक दिवस हा वाद चालला. यामध्ये अनेक राजकीय महिला नेत्यांनी देखील टीका टिप्पणी केली. तर चित्रा वाघ यांनी थेट उर्फी जावेद विरोधात महिला आयोगाकडे तक्रार देखील केली होती. त्यावर उर्फी जावेदने देखील चित्रा वाघांना जोरदार प्रतिकाार केला. पण तिने या प्रकरणात माफी मागितली नव्हती.

या प्रकरणानंतर मात्र शुक्रवारी अचानक एक ट्विट करत नेटकऱ्यांना धक्का दिला आहे. या ट्विटमध्ये तिने थेट माफी मागितली आहे. एवढेच नाही तर आता यापुढे आपण अशा प्रकारचे कपडे घालणार नसून मी माझ्या कपड्यांची स्टाईल बदलणार असल्याचं देखील तिने या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ती म्हणाली की, माझ्या कपड्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागते. यापुढे मी माझ्या कपड्यांची स्टाईल बदलणार आहे.

लेक वणव्यामध्ये गारव्यासारखी! वडिलांबद्दल बोलताना भाऊ कदमची लेक भावूक, अभिनेता पोस्ट करत म्हणाला…

उर्फीच्या या ट्वीटने लोक चकित झाले आहेत. ‘उर्फीला काय झालं?’ या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. काहींनी तिला यामागील कारण विचारलं तर काहींनी तिची चेष्टा केली. तसेच काही युझर्सने तिला आता तरी समज आली अशा प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. तर आज एप्रिल महिना सुरू होणार असल्याने तिने ही चेष्टा केली आहे. एप्रिल फूल केलं असल्याचं देखील एकाने म्हटलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube