Vaani Kapoor : जगभरातून मिळालेलं प्रेम हाच आमच्यासाठी खरा सन्मान

Vaani Kapoor : नेटफ्लिक्स आणि वाईआरएफ एंटरटेनमेंटची पहिली पौराणिक-क्राईम थ्रिलर सीरीज मंडला मर्डर्स (Mandla Murders) 25 जुलैला प्रेक्षकांसमोर आली. या शोद्वारे वाणी कपूरने (Vaani Kapoor) स्ट्रीमिंगमध्ये पदार्पण केलं आणि या आव्हानात्मक व वेगळ्या शैलीतील भूमिकेत तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. वाणी कपूरसाठी हा प्रोजेक्ट विशेष ठरला, कारण हा तिचा पहिला सहकार्य होता दिग्दर्शक गोपी पुथरण यांच्यासोबत, जे मर्दानी मालिकेसाठी प्रसिद्ध आहेत.
वाणी म्हणाली ,“मंडला मर्डर्स सलग तीन आठवडे जागतिक पातळीवर ट्रेंड होताना पाहणं खरंच अविश्वसनीय आहे. एवढा प्रचंड प्रतिसाद मिळेल असं मी कधीच विचार केला नव्हता. ज्यांनी हा शो पाहिला आणि सपोर्ट केला, त्या प्रत्येक व्यक्तीची मी मनापासून आभारी आहे. माझ्यासाठी हा स्ट्रीमिंग डेब्यू खूप वैयक्तिक टप्पा आहे, ज्याला मी आयुष्यभर जपून ठेवेन.”
वाणी पुढे म्हणाली ,“मंडला मर्डर्स आम्ही खूप मनापासून बनवली आणि ती देशाच्या सीमा ओलांडून प्रेक्षकांशी इतक्या ताकदीने जोडली गेली, हेच आमच्यासाठी सगळ्यात मोठं बक्षीस आहे. भारत नेहमीच आपल्या पुराणकथा आणि गोष्टी साठी ओळखला जातो आणि ह्याच मूळांशी असलेलं नातं आमच्या कंटेंटला फक्त इथल्या नाही तर जगभरातील प्रेक्षकांशीही घट्ट जोडतं, ज्यांना आपल्या संस्कृतीबद्दल आणि ओळखीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.”
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित ‘नाट्य परिषद करंडक 2025’; 15 संघ सहभागी
ही मालिका नेटफ्लिक्स आणि वाईआरएफच्या क्रिएटिव्ह पार्टनरशिपमधील दुसरी सीरीज आहे, 2023 मधील द रेलवे मैन च्या जागतिक यशानंतर मंडला मर्डर्समध्ये वैभव राज गुप्ता, सुरवीन चावला आणि श्रिया पिलगावकर यांसारखे दमदार कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. या सीरीजचं दिग्दर्शन गोपी पुथरण यांनी केलं असून मनन रावत सहदिग्दर्शक आहेत.