Pre Wedding Photoshoot : लगीनघाई दरम्यान वनिता खरातने शेअर केला बोल्ड फोटो

Vanita Kharat

मुंबई : महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्री वनिता खरातने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या प्री वेडिंग फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तीने एक अत्यंत बोल्ड फोटो शेअर केला आहे. ‘गुपित मौनांचे नजरेस कळावे, ओठांचे मग चुंबन व्हावे।’ असं कॅप्शन देत तिने थेट तिचा होणारा नवरा सुमित लोंढे याच्यासोबतचा किसींगचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते आता तीच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. मात्र आता लगीन घाई दरम्यान वनिता खरातने आपल्या सोशल मिडीयावर बोल्ड फोटो शेअर केला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये ती पुन्हा एकदा चर्चेला आली आहे.

या अगोदर देखील अभिनेत्री वनिता खरातने न्यूड फोटोशूट केले होते. त्यामुळे तिच्यावर अनेकांकडून आक्षेप देखील घेण्यात आले होते. त्यानंतर आपल्या न्यूड फोटोशूटवर वनिता खरातने स्पष्टीकरण दिले होते.

दरम्यान अभिनेत्री वनिता खरातने आताचे फोटोशूट करण्याचे कारण म्हणजे वनिता लवकरच तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे याच्यासोबत विवाह बंधनात अडकणार आहे. तिने या अगोदरच आपल्या लग्नाची घोषणा केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube