विजयच्या ‘वरिसु’ चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला जमवला

विजयच्या ‘वरिसु’ चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला जमवला

मुंबई : थलपथी विजय आणि रश्मिका मंदाना अभिनीत ‘वरिसु’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या तीन दिवसांत 80 कोटींची कमाई केली. आता या चित्रपटाने जगभरातून मोठाच गल्ला जमवला आहे. प्रदर्शनाच्या चौथ्या दिवसातच या चित्रपटाने 100 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने जगभरातून 103 कोटींची कमाई केली.

थलपथी विजय आणि रश्मिका मंदाना अभिनीत वारिसू, 11 जानेवारीपासून रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडत आहे. चौथ्या दिवशी हा सोनमने जागतिक स्तरावर 100 कोटींचा आकडा पार केला आहे.

वरिसुहा वामशी पैडिपल्ली दिग्दर्शित कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती दिल राजूने केली आहे. वारिसूमध्ये थलपथी विजय, रश्मिका मंदान्ना, प्रकाश राज, सरथकुमार, जयसुधा, श्रीकांत, शाम आणि योगी बाबू यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

चित्रपटाचे संगीत एस थमन यांनी दिले आहे. वारिसूच्या तेलगू आवृत्तीचे नाव वारसुडू आहे. तेलुगु व्हर्जन 14 जानेवारीला आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपट भारतातच नव्हे तर परदेशातही या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. प्रदर्शनाच्या चार दिवसातच या चित्रपटाने 100 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने जगभरातून 103 कोटींची कमाई केली. त्यामुळे ‘वरिसु’ 100 कोटींचा आकडा पार करणारा थालापती विजयाची दहावा चित्रपट ठरला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube