Varun Lavanya wedding : करवा चौथच्या मुहुर्तावर वरूण आणि लावण्या अडकले लग्नबंधनात
Varun Lavanya wedding : वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी लग्नबंधनात (Varun Lavanya wedding) अडकले आहेत. बुधवारी करवा चौथच्या मुहुर्तावर त्यांचा विवाह संपन्न झाला. त्यांच्या या विवाहसोहळ्याचे खास फोटो वरूण तेजने आपल्या सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये हे जोडपं अत्यंत सुंदर दिसत आहे.
वरूणने लिहिलं माझं प्रेम…
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा पार पडला होता. तर या लग्नाच्या फोटोंना कॅप्शन देताना वरूणने लिहिले की, ‘माझं प्रेम’. वरुण तेज हा अभिनेता-निर्माता नागेंद्र बाबू यांचा मुलगा आहे. तसेत तो चिरंजीवी आणि पवन कल्याणचा पुतण्या आहे. तर लावण्या ही देखील दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने ‘अंदाला राक्षसी’ या सिनेमाच्या माध्यमातून २०१२ साली सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. २०१७ साली आलेल्या ‘मिस्टर’ या सिनेमाच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली होती.
Ahmednagar News : नगरमधून मुलं-मुली बेपत्ता; संग्राम जगतापांचं पोलिस अधीक्षकांकडं साकडं
‘मिस्टर’ सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान वरुण आणि लावण्याची चांगली मैत्री झाली होती. पुढे त्यांच्या मैत्रीचे रुपांतर हे प्रेमात झालं आणि आता ते आता लग्नबंधनात अडकले आहेत.लावण्या त्रिपाठी उत्तप प्रदेशची असून तिने उत्तराखंडातील देहरादूनमध्ये शालेय शिक्षण घेतलं आहे. तर पदवीच शिक्षण तिने मुंबईतील ऋषी दयाराम नॅशनल महाविद्यालयात पूर्ण केले आहे. त्यावेळीच तिला अभिनयाची गोडी लागली. तिने मॉडेलिंग करायला सुरूवात केली.
PCMC Recruitment 2023 : 10 वी पास उमदेवारांना नोकरीची संधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू
त्यानंतर काही जाहिरातींमध्ये काम केल्यानंतर तिने मालिकाविश्वात काम केलं. त्यानंतर तिने ‘अंडला राक्षसी नाम’ या चित्रपटातून तिने दाक्षिणात्या चित्रपटासृष्टीत पदार्पण केलं. तिच्या नावावर 2006 सालचा ‘मिस उत्तराखंड’चा किताबही जिंकला आहे. तर या वर्षी तिने ‘पुली मेका’ या सिरीजच्या माध्यामातून ओटीटी विश्वात पदार्पण केलं आहे. तर आता ती दाक्षिणात्य अभिनेता आणि चिरंजीवीचा मुलगा वरूण तेजशी विवाहबद्ध झाली आहे.