ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

Veteran actress Sulochanadidi Shushrusha admitted to hospital : मनोरंजन जगतातून एक वाईट बातमी समोर आली आहे. चित्रपटसृष्टी धोक्याच्या उंबरठ्यावर असून आता आणखी एका अभिनेत्रीची प्रकृती खालावली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर (Sulochanadidi Latkar)यांची तब्येत बिघडली असून त्यांना उपचारासाठी दादर येथील सुश्रृषा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याचं वय 94 वर्ष असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुलोचनादीदी ह्या गेल्या काही महिन्यांपासून श्वसनाच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्यावर सुश्रृषा रुग्णालयात उपचार सुरू होते. मार्चमध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुलोचनादीदींना मतत करण्याचे आवाहन करत मुख्यमंत्री निधीतून त्यांच्यावर उपचार केले होते. दरम्यान, आज पुन्हा त्यांची तब्येत खालावली असून त्यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखलं केलं आहे.

‘पद्मश्री’ आणि ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित असलेल्या सुलोचनादीदी यांनी हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतही आपल्या दमदार अभिनयाने छाप सोडली आहे. त्यांचा जन्म 30 जुलै 1928 रोजी झाला. 1943 मध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. भालजी पेंढारकर यांनी सुलोचना यांना अभिनय क्षेत्रात मार्गदर्शन केले. सुलोचनादीदी त्यांच्या तालीमीत तयार झाल्या. आपल्या देखण्या रुपानं आणि सहज अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले.

1959 मध्ये आलेल्या ‘दिल देके देखो’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा आईची भूमिका साकारली होती. त्यानंतर 1995 पर्यंत दीदींनी अनेक दिग्गज कलाकारांच्या ‘आई’ची भूमिका साकारली. सुलोचनादीदींनी एक सौम्य, शांत आई अशी प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली. त्यांनी चित्रपटांमध्ये घरंदाज भूमिका साकारल्या होत्या.

IND vs AUS Final: अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे ‘हा’ खेळाडू बाहेर

सुलोचनादीदींनी 250 हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांतून आपला ठसा उमटवला. ‘वहिनीचे बांगड्या’, ‘मीठ भाकर’, ‘धाकडी जाऊ’ यांसारखे त्यांचे अनेक चित्रपट हिट ठरले. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही सुलोचनादीदींनी आपली छाप सोडली. त्यांनी पृथ्वीराज कपूर, नाझीर हुसैन, अशोक कुमार यांच्यासोबत सहकलाकार म्हणून काम केले. त्यामुळे मराठी भाषिकच नाही, तर हिंदी भाषिक वर्गही त्यांचा चाहता वर्ग होता. आपल्या प्रत्येक भूमिकेवर सुलोचनादीदींनी आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली आणि म्हणूनच त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात आहे. दरम्यान, सुलोचनादीदी आजारी असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानं त्यांचे चाहते त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, म्हणून प्रार्थना करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube