Dev Kohli: गीतकार देव कोहली यांचे निधन; वयाच्या 81 व्या घेतला अखेरचा श्वास

Dev Kohli: गीतकार देव कोहली यांचे निधन; वयाच्या 81 व्या घेतला अखेरचा श्वास

Dev Kohli Passed Away: हिंदी आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे 24ऑगस्टला निधन झाले. त्याच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली. यानंतर आता कलाविश्वातील आणखी एका दिग्गज कलाकाराचे निधन झाले आहे. बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ गीतकार देव कोहली (Dev Kohli) यांचे आज, शनिवारी निधन झाले आहे. देव यांनी वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

गीतकार देव कोहली यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये “मैंने प्यार किया”, बाजीगर, जुडवा २, मुसाफिर, शूटआउट अॅट लोखंडवाला, टॅक्सी नंबर नौ दो ग्यारह अशा हटक्या १०० पेक्षा जास्त हिट सिनेमासाठी गाणी लिहिली आहेत. देव कोहली यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी मुंबईमधील त्यांच्या घरी दुपारी २ वाजता ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

देव कोहली यांना नुकतेच अंधेरीमधील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दाखल करण्यात आले होते. सर्व उपचार करून देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. गेल्या १० दिवसांपूर्वी त्यांना घरी पाठवण्यात आले होते. या ज्येष्ठ गीतकाराचे आज पहाटे ४ वाजता झोपेतच निधन झाल्याचीही वार्ता देण्यात आली. देव कोहलीच्या निधनामुळे मनोरंजनसृष्टीत मोठी शोककळा पसरली आहे.

Milind Safai Passed Away : अभिनेते मिलिंद सफई यांचं निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी

देव कोहली यांचा जन्म २ नोव्हेंबर १९४२ दिवशी झाला. ते १९४८ मध्ये दिल्ली या ठिकाणी आले आणि नंतर १९४९ मध्ये देहरादूनला स्थलांतरित झाले होते. त्यांचे शिक्षण देहरादूनमध्ये झाले. शंकर– जयकिशनपासून ते विशाल आणि शेखरपर्यंत, देव कोहली यांनी १९६९ ते २०१३ पर्यंतच्या कारकिर्दीत संगीतकारांच्या अनेक पिढ्या काम केले आहे. त्यांचे लोकप्रिय गाणे “गीत गाता हूं मैं” हे राजकुमार आणि हेमा मालिनी अभिनीत ‘लाल पत्थर’ (१९७१) मध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. गीतकार म्हणून हा त्यांचा दुसरा सिनेमा होता. तसेच पुढे त्यांनी ‘मैने प्यार किया’साठी त्यांना आणखी १८ वर्षे वाट बघावी लागली होती, जे गीतकार म्हणून त्यांचा मोठा ब्रेक ठरला. त्यानंतर, त्यांनी नव्वदच्या दशकात आणि २००० च्या दशकाच्या मध्यापर्यंत ‘खिलाडी’, ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘बाजीगर’, ‘हम आपके है कौन…!’, ‘आंतरराष्ट्रीय खिलाडी’, ‘कांटे’ आणि ‘मुसाफिर’ असे हिट सिनेमा दिले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube