Download App

Video : अक्षयच्या ‘वेलकम 3’ मध्ये बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांची फौज

  • Written By: Last Updated:

Welcome 3 : सध्या ‘वेलकम 3’ ची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. सिनेमात खिलाडी कुमार (Akshay Kumar), संजय दत्त, अर्शद वारसी आणि सुनील शेट्टी या तगड्या मुख्य कलाकारांची फौज सिनेमाच्या प्रमुख भूमिका साकारत आहे. नुकताच सिनेमाबद्दल नवीन अपडेट देण्यात आली आहे. ती म्हणजे या चित्रपटाची रिलीज जाहिर करण्यात आली आहे. त्याचबरोबर चित्रपटाची टीझर देखील आला आहे.

‘बारामतीचा निकाल शून्य टक्के’; भर भाषणात अजित पवारांनी टोचले शिक्षकांचे कान…

वेलकम 3 चा टीझर रिलीज…
वेलकम 3 ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाची घोषणा निर्मात्यांसह अक्षयने त्याच्या सोशल मिडीया अकाऊंटवर या चित्रपटाची टीझर शेअर केला आहे. त्याने या टीझरला कॅप्शन देताना म्हटले की, स्वतः ला आणि तुम्हाला सगळ्यांना वाढदिवसाच्या दिवशी अक खास गिफ्ट दिलं आहे. जर तुम्हाला आवडल्यास धन्यावाद म्हणा. मी वेलकम म्हणत आहे. असं म्हणत त्याचे कंसात चित्रपटाचं नाव वेलकम 3 लिहिलं आहे. तसेच

शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून श्रेयवादाची लढाई, सरकारकडून अनावरणास स्थगिती; ठाकरे गटाची कोंडी!

या टीझरमध्ये चित्रपटातील पूर्ण स्टारकास्ट दाखवण्यात आली आहे. जसं चित्रपटाचं नाव ‘वेलकम टू द जंगल’ आहे. त्याप्रमाणे सगळे जंगलात दाखवण्यात आले आहेत. तसेच सगळे सैन्याच्या पोशाखात पाहायला मिळत आहेत. त्यांच्या हातात बंदूक आहेत. ते चित्र विचित्र आवाज काढत आहेत. त्याचबरोबर चित्रपटाचं शीर्षगीत वेलकम गाताना हे सर्व कलाकार दिसत आहेत.

यामध्ये तुम्हाला अक्षय कुमार, संजय दत्त, अरशद वारसी, दिशा पाटनी, रवीना टंडन, लारा दत्ता, परेश रावल, दिलेर मेहंदी, मीका सिंह, राजपाल यादव, जॉनी लीवर यांच्या अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत.

वेलकमला भरघोस प्रतिसाद मिळाल्यावर दुसऱ्या भागाने चाहत्यांना निराशा केल्याचे बघायला मिळाले होते. ‘वेलकम’च्या दुसऱ्या भागामध्ये जॉन अब्राहम आणि श्रृती हसनने हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये होते. नुकतंच निर्मात्यांनी ‘वेलकम ३’ची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखेची माहिती देखील देण्यात आली आहे. त्यानुसार आता 20 डिसेंबर 2024 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags

follow us