आता हायड्रोजन बॉम्ब फोडणार, मोदी जनतेला चेहरा दाखवू शकणार नाही: राहुल गांधींचा मोठा दावा

Rahul Gandhi : काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 7 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर (Election Commission) मतचोरीचा आरोप केला होता. तर आता पुन्हा एकदा या प्रकरणात राहुल गांधी यांनी मोठा दावा केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. राहुल गांधी सध्या बिहार (Bihar) दौऱ्यावर असून मतदार अधिकार यात्रा करत आहे. या यात्रेदरम्यान एका जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना इशारा दिला आहे. ॲटम बॉम्बनंतर आता मोठा हायड्रोजन बॉम्ब (Hydrogen Bomb) येत आहे. तुमच्या मत चोरीचे सत्य आता संपूर्ण देशाला कळणार आहे. असं राहुल गांधी या सभेत बोलताना म्हणाले. तसेच या हायड्रोजन बॉम्बनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेला आपला चेहरा दाखवू शकणार नाही असा दावा देखील राहुल गांधी यांनी केला आहे.
या सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, महादेवपुरा येथे ‘मत चोरी’च्या स्वरूपात ॲटम बॉम्ब टाकल्यानंतर आम्ही लवकरच हायड्रोजन बॉम्ब आणू. महात्मा गांधींची हत्या करणारे आता लोकशाही आणि संविधान मारण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांना हे करू देणार नाही. अलिकडेच आम्ही देशासमोर ‘मत चोरी’ चे पुरावे सादर केले. मत चोरी म्हणजे लोकांच्या हक्कांची, लोकशाहीची आणि भविष्याची चोरी असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी 7 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अनियमिततेचा दावा करत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. बेंगळुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघातील एका विधानसभेत एक लाखाहून अधिक बनावट मतदारांद्वारे निवडणूक हेराफेरीचा दावा त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला होत.
BJP के लोगों तैयार हो जाओ – Atom bomb के बाद अब Hydrogen bomb आने वाला है।
पूरे देश में हम आपकी वोट चोरी का पर्दाफाश करेंगे। pic.twitter.com/RdadvPTmwq
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 1, 2025
पुढे राहुल गांधी म्हणाले की, आमच्या लोकांनी कागदी मतदार यादीतील पत्ता आणि फोटो जुळवून घेऊन पुरावे देशासमोर ठेवले. त्यासाठी 17-17 तास लागले. मी बिहारच्या तरुणांना सांगू इच्छितो की मत चोरी म्हणजे हक्कांची चोरी, आरक्षणाची चोरी, लोकशाहीची चोरी, तरुणांच्या भविष्याची चोरी. ते फक्त मते घेत नाहीत तर तुमची जमीन आणि रेशन कार्ड काढून घेतील आणि ते अदानी-अंबानींना देतील.
आंदोलनाला परवानगी का? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या शक्ती गांधी आणि आंबेडकरांच्या संविधानाची हत्या करण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणूनच आम्ही बिहारमध्ये प्रवास केला आहे आणि तुमचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. असं राहुल गांधी म्हणाले.