‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्यात नेमकं पडद्यामागे काय घडतं? पाहा…

‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्यात नेमकं पडद्यामागे काय घडतं? पाहा…

औरंगाबाद : ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे शेवटचे दोन प्रयोग छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडणार आहे. यावेळी नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या सोशल मिडीयावरून या नाटकाच्या पडद्यामागे नेमकं काय घडतं? याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये ‘शिवपुत्र संभाजी’ नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते खासदार अमोल कोल्हे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या लूकमध्ये कसे येतात. त्यांचा मेकअप, पोशाख कसा कोला जातो. या नाटकाच्या पडद्यामागे नेमकं काय घडतं? या सर्व गोष्टी पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले की, ‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाट्य संपताना अवघ्या काही वेळात भरजरी पेहरावातील छत्रपती संभाजी महाराज पुन्हा प्रेक्षकांसमोर येतात. कारण पालक तेथे आपल्या मुलांना घेऊन आलेले असतात. त्या पुढील पीढीसमोर तेच राजबिंडे छत्रपती संभाजी महाराजच आले पाहिजे अशी प्रतिक्रिया अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांनी दिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube