Bharat Dabholkar : इंग्रजीत अनेक नाटकं पण मराठीत..,; भरत दाभोळकरांनी उलगडला प्रवास!
इंग्रजी भाषेसह इतर भाषेत अनेक नाटके केली, परंतू इंग्रजी नाटक पहिल्यांदाच मराठीत करत असल्याचं लेखक-दिग्दर्शक भरत दाभोळकरांनी सांगितलंय.
Bharat Dabholkar : इंग्रजी भाषेसह इतर भाषेत अनेक नाटके केली आहेत, परंतू इंग्रजी नाटक पहिल्यांदाच मराठीत करत असल्याचं लेखक-दिग्दर्शक भरत दाभोळकर (Bharat Dabholkar) यांनी लेट्सअप मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितलंय. दरम्यान, ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ हे इंग्रजी नाटक मराठी रंगभूमीवर सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर भरत दाभोळकर यांनी लेट्सअप मराठीला खास मुलाखत दिलीयं. यावेळी बोलताना दाभोळकरांनी आपली जीवनप्रवासाविषयी परखडपणे भाष्य केलंय.
काँग्रेसची माघार, पण बिचुकले-करुणा मुंडेंचा शड्डू बारामतीत सुनेत्रा पवारांसमोर 22 उमेदवार रिंगणात
पुढे बोलताना दाभोळकर म्हणाले, मराठी नाटक इंग्रजीमध्ये करण्यासाठीचा कित्येक वर्षांपूर्वीचा माझा प्रवास आहे. मी लिहिलेलं इंग्रजी नाटक मुंबईतला कोणीही ख्यातनाम प्रोड्यूसर करण्यास तयार नव्हता , हे चालणार नाही असं मला प्रोड्यूसरने सांगितलं होतं, कोणीच प्रोड्यूस करायला तयार नव्हता. मी फुलेंना ओळखतो नव्हतो, मी त्यांना पत्र लिहिलं. आणि विचारलं की तुम्ही परवानगी द्याल का? ते म्हणाले नाही… कारण हे नाटक हिंदीत झालंय, गुजरातीत झालंय त्यात तो मराठीचा फिवर आलेला नाही.
पुन्हा पत्र लिहून त्यांना मी सांगितलं की तुम्ही मला बदल करायला सांगा ते मी करेल, मी स्क्रिप्टही पाठवली होती. त्यावर त्यांनी मला पत्र पाठवून सांगितलं की तु काहीही बदल न करता नाटक कर. हे फुलेंना त्यावेळी कळालं होतं, असं दाभोळकरांनी स्पष्ट केलंय.
प्रेमाचं जाळं अन् 3 लाखांची लूट; AI च्या मदतीने खाकीचा बनावट डौल नाशिक पोलिसांनी उतरवला
तसेच त्यावेळी आमची टीम होती, मनमोहन कृष्ण, आत्माराम भेंडे, वृषाली गोखले, मोहन भंडारी हरिषपटेल अशी माणसे होती. कोणालाही इंग्रजी बोलता येत नव्हतं, तेव्हा त्यांना मी म्हणालो हिंदीतही बोला. त्यावेळी लोकांनी हे नाटक डोक्यावर घेतलं. नाटकावर आम्हाला पान भरुन रिव्ह्यू येत असायचे. तेव्हापासून ते आत्तापर्यंत मी जवळपास 35 नाटके लिहिली आहेत. नथुराम गोडसेवर आम्ही इंग्रजी, हिंदी, गुजराती भाषेत नाटके केली. गुजरात दौऱ्यात असताना मला वाटलं की, आपण तिन्ही भाषेत करत आहोत तर मग मराठीत का नाही? त्यानंतर मराठीत नाटक करण्याचा निर्णय घेतल्याचंही दाभोळकरांनी स्पष्ट केलंय.
ना खाऊंगा, ना खाने दुंगाचा नारा पोकळ! 12 वर्षापासून मोदींच्या सहभागानेच देशाची लूट; सपकाळांचा घणाघात
दरम्यान, गुजरातमध्ये दौरा करत असताना असताना मला वाटलं की, आपण तिन्ही भाषेत करीत आहोत तर मग मराठीत का नाही? त्यावर आकाश भडसावळे मला म्हणाला कुठलंही नाटक सांग. मी प्रोड्यूस करायला तयार आहे. त्यानंतर आम्ही कॅरी ऑन स्पायगिरी नाटक करण्याचा जाहीर केलं. या नाटकामध्ये पाकिस्तानतला सुलतान अन् कमांडर, सोबतच मराठी कुटुंबिय आहेत. माझ्या मते हे मराठी नाटक इंग्रजी नाटकापेक्षा चांगलं होतंय, कलाकार अप्रतिम करत असल्याचं भरत दाभोळकरांनी सांगितलंय.