काँग्रेसची माघार, पण बिचुकले-करुणा मुंडेंचा शड्डू बारामतीत सुनेत्रा पवारांसमोर 22 उमेदवार रिंगणात

Sunetra Pawar बारामती पोटनिवडणुकीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले असून, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 30 उमेदवारांनी माघार घेतली आहे

  • Written By: Published:
काँग्रेसची माघार, पण बिचुकले-करुणा मुंडेंचा शड्डू; बारामतीत सुनेत्रा पवारांसमोर 23 उमेदवार रिंगणात

Baramati by-poll Final 23 Candidate List : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले असून, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 30 उमेदवारांनी माघार घेतली असली, तरी सुनेत्रा पवारांसह अद्याप 23 उमेदवार रिंगणात कायम आहेत.  काँग्रेसच्या माघारीनंतरही बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आणि करुणा मुंडेंसारख्या 22 उमेदवारांनी शड्डू ठोकल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दिग्गज नेत्यांनी केलेले प्रयत्न अखेर अपयशी ठरले आहेत.

Baramati By Election : दोन पावलं मागे अन् मोठी झेप; बारामतीत काँग्रेसच्या माघारीमागची खरी स्क्रिप्ट

नेत्यांचे प्रयत्न ठरले अपुरे

ज्येष्ठ नेते शरद पवार, आमदार रोहित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीनुसार बिनविरोध व्हावी, यासाठी पडद्यामागून मोठी फिल्डिंग लावली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या फोननंतर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आकाश मोरे यांनी आपला अर्ज मागे घेतला. मात्र, काही अपक्ष उमेदवारांच्या ठाम भूमिकेमुळे ‘बिनविरोध’ निवडणुकीचे स्वप्न भंगले आहे.

बिचुकले आणि करुणा मुंडेंचे आव्हान कायम

या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकले आणि करुणा मुंडे-शर्मा यांची. अनेक उमेदवारांनी माघार घेतली असली, तरी बिचुकले आणि करुणा मुंडे यांनी आपले अर्ज मागे न घेतल्याने बारामतीची लढत आता रंगतदार वळणावर आली असून .  सुनेत्रा पवारांसह एकूण 23 जण आता नशीब आजमावणार आहेत.

अखेर राहुरी विधानसभा बिनविरोध नाहीच; राहुरीत भाजपसमोर राष्ट्रवादी, वंचितसह 7 उमेदवारांचे आव्हान

एकूण आलेले अर्ज : 53

माघारी घेतलेले उमेदवार : 30 (काँग्रेसच्या आकाश मोरे यांच्यासह)

मैदानात उरलेले उमेदवार : 23

सुनेत्रा पवारांचे पारडे जड, पण लढत अटळ

काँग्रेसने बारामती पोट निवडणुकीतून जरी अधिकृतपणे माघार घेतल्याने महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची बाजू भक्कम झाली आहे. मात्र, त्यानंतरही रिंगणात 23 उमेदवार असल्याने आता 23 एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडेल. राजकीय विश्लेषकांच्या मते, प्रमुख पक्षांनी माघार घेतली असली तरी अपक्ष उमेदवार किती मते घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Baramati by-poll Final 23 Candidate List

बारामती पोटनिवडणुकीसाठी महत्त्वाच्या तारखा 

मतदान : 23 एप्रिल 2026

मतमोजणी : 4 मे 2026

संसदेत नव्या पर्वाची सुरुवात, पण स्टाइल जुनीच; पार्थ पवारांनी जपला अजित पवारांचा गुलाबी जॅकेट लूक

सुनेत्रा पवारांसमोर असलेले 22 उमेदवार कोण?

1. सतीश कृष्ण कदम हिंदुस्थान जनता पार्टी
2. सागर शरद भिसे अपक्ष
3. रघु येता घुटुकडे नवीन राष्ट्रीय समाज पक्ष
4. गजानन उत्तम गवळी अपक्ष
5. दत्तात्रय रावसाहेब बेदरे अपक्ष
6. अभिजीत वामनरो आवाडे-बिचुकले अपक्ष
7. मिथुन सोपानराव आटोळे अपक्ष
8. विराज महादेव शिंदे अपक्ष
9. विजयकुमार रामचंद्र भिसे अपक्ष
10. शिवाजी जयसिंग कोकरे अपक्ष
11. अविनाश वामनराव गायकवाड अपक्ष
12. चंद्रकांत सुर्यकांत वाघमोडे अपक्ष
13. मंगलदास निकाळजे अपक्ष
14. सीताराम विठ्ठल रणदिवे अपक्ष
15. योगेश मोहनदास रतेश्वर अपक्ष
16. बाळासो मारुती धपटे अपक्ष
17. सतीश नाना सोनवणे अपक्ष
18. करुणा धनंजय मुंडे अपक्ष
19. सोनाली सूर्यकांत राणे अपक्ष
20. रोहित राजू भोसले अपक्ष
21. साजन भगवान अडसूळ अपक्ष
22. चंद्रकांत रामभाजी मोटे अपक्ष

 

follow us