“चाळीत कैरी चोरण्याची मज्जा वेगळीच होती” योगिताने उन्हाळाच्या आठवणींना दिला उजाळा
Tu Anolakhi Tari Sobati : 'सन मराठी'वरील तू अनोळखी तरी सोबती या मालिकेत नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. सध्या मालिकेत
Tu Anolakhi Tari Sobati : ‘सन मराठी’वरील तू अनोळखी तरी सोबती या मालिकेत नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. सध्या मालिकेत अर्पिता स्वतःच घर वाचवण्यात यशस्वी ठरली आहे. यामुळे समीरने तिचे आभार मानत कौतुक केलं आहे. मालिकेत हळू हळू समीर व अर्पिताची मैत्री फुलताना दिसत आहे. नीलांबरी अर्पिता व समीर यांच्यात दुरावा येण्यासाठी नवा डाव रचताना दिसत आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अर्पिताची कठोर परीक्षा घेण्यासाठी एका आजीची एन्ट्री झालेली पाहायला मिळते. अर्पिता या सगळ्या आव्हानांना कशी तोंड देणार? यात अर्पिताला समीरची साथ मिळेल का? नीलांबरीचा डाव यशस्वी होईल का? हे पाहणं रंजक ठरणार आहे. ही मालिका दररोज रात्री 9.31 मि. ‘सन मराठी’वर प्रसारित होते.
सध्या महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उन्हाळा सुरु झाला की कलाकारांचं मन देखील लहानपणीच्या आठवणींमध्ये रमतं. ‘तू अनोळखी तरी सोबती’ या मालिकेतील अर्पिता म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण (Yogita Chavan) उन्हाळाच्या आठवणींबद्दल बोलताना म्हणाली की, “लहानपणी उन्हाची इतकी झळ नसायची जितकी आता असते. सुट्टीत मामाकडे जाणं, मित्र मैत्रिणींसोबत खेळणं अशी बरीच धमाल आम्ही करायचो. पण माझ्या सगळ्यात जवळची एक आठवण म्हणजे मी किसननगरला राहत असताना रात्री लाईट जायची त्यामुळे खूप गरम व्हायचं. तेव्हा आम्ही मित्र-मैत्रिणी टेरेसवर झोपायला जायचो. सगळे आपापली चादर, गाद्या सोबत घेऊन यायचे. त्यावेळी कुणाकडे फोन नव्हते म्हणून खूप साऱ्या गप्पा मारत टेरेसवर झोपायचो.”
योगिता पुढे म्हणाली की, “उन्हाळ्यातील आणखी एक आठवण म्हणजे आमच्या चाळीत बरीच कुटुंब आंब्याचं लोणचं बनवायचे तर त्यासाठी टेरेसवर कैऱ्या वाळत घातलेल्या असायच्या आणि आम्ही त्या कैऱ्या चोरून खायचो. जेव्हापासून कैऱ्या कमी होत चालल्या आहेत हे सगळ्यांना समजायला लागल तेव्हापासून टेरेसला कुलूप लावायला सुरुवात केली. आज जर मला पुन्हा एकदा उन्हाळी सुट्टी मिळाली तर मी लगेच मामाच्या गावी जाईन. लहानपणीच्या सगळे खेळ अगदी तशीच मज्जा करेन. उन्हाळा म्हंटल की, आंबे खाणं आलंच.
‘किंग कोहली’ चा आणखी एक विक्रम; T20 क्रिकेटमध्ये14,000 धावांचा टप्पा पार
लहानपणी दिवसाला 7-8 आंबे खायचे पण आता अभिनेत्री म्हणून स्किनची देखील काळजी घ्यावी लागते. चेहऱ्यावर उष्णता येऊ नये म्हणून खूप कमी प्रमाणात आंबे खाते. सध्या प्रचंड उन्हाची झळ जाणवते यासाठी भरपूर पाणी पिणं, पौष्टिक गोष्टी खाणं, चेहऱ्याला भरपूर सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे. मालिकेच्या सेटवर सगळे कलाकार स्वतःचा फॅन घेऊन येतात आमची पडद्यामागची टीम सगळ्या कलाकारांची खूप काळजी घेते. त्यामुळे उन्हाचा तडाखा असला तरी आम्ही हसत खेळत शूटिंग करतो.”