‘किंग’च्या परदेशातील वितरण हक्कांबाबत शाहरुखने घेतला मोठा निर्णय; YRF ची माघार

Shah Rukh Khan On King Overseas Distribution Rights : बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Shah Rukh Khan On King Overseas Distribution Rights

Shah Rukh Khan On King Overseas Distribution Rights : बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘किंग’ (King) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटासंदर्भात आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ‘किंग’च्या परदेशातील वितरण हक्कांबाबत (Overseas Distribution Rights) शाहरुख खानने स्वतः पुढाकार घेतला असून, यासाठी त्याने थेट दिग्दर्शक आणि निर्माते आदित्य चोप्रा यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे.

‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुख खानच्या टीममधील एका सूत्राने सांगितले की, शाहरुख आणि आदित्य चोप्रा यांचे नाते अत्यंत जवळचे आहे. आदित्य चोप्रा यांच्या दिग्दर्शनातील पहिल्याच ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (1995 ) या चित्रपटात शाहरुखने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक यश मिळवले. विशेष म्हणजे, आजही मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो.

यानंतरही शाहरुखने यशराज फिल्म्सच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तसेच दिवंगत ज्येष्ठ दिग्दर्शक यश चोप्रा यांच्याशीही त्याचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. याच मैत्रीपूर्ण नात्याचा विचार करून शाहरुखने आदित्य चोप्रांना वैयक्तिक फोन केला आणि ‘किंग’च्या वितरण हक्कांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. सूत्राने पुढे सांगितले की, दोघांमध्ये अतिशय सकारात्मक आणि खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. शाहरुखची भूमिका समजून घेत आदित्य चोप्रांनीही ‘किंग’चे परदेशातील वितरण हक्क सोडण्यास सहमती दर्शवली. एवढेच नाही, तर त्यांनी शाहरुखला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या असून, ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट पाहण्यासाठी आपण उत्सुक असल्याचेही सांगितले.

‘किंग’च्या संगीतामध्येही मोठे बदल

दरम्यान, ‘किंग’ चित्रपटाबाबत अलीकडेच आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या होत्या. आपल्या दमदार बॅकग्राउंड स्कोअरमुळे लोकप्रिय असलेला संगीतकार अनिरुद्ध रविचंदर याने व्यग्र वेळापत्रकामुळे परस्पर संमतीने या चित्रपटातून माघार घेतल्याचे वृत्त होते. मात्र, चित्रपटातून बाहेर पडण्यापूर्वी त्याने शाहरुख खानला ‘किंग’ची थीम ट्रॅक सुपूर्द केली. सुपरस्टारबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. आता संगीतकार जोडी सचिन-जिगर या थीम ट्रॅकला नव्याने संगीतबद्ध करणार असून, याच ट्रॅकच्या आधारावर चित्रपटाचा बॅकग्राउंड स्कोअर तयार केला जाणार आहे.

T-Series कडे 50 वर्षांसाठी संगीताचे हक्क

दुसरीकडे, ‘किंग’चे एक्सक्लुझिव्ह ग्लोबल कमर्शियल म्युझिक राइट्स टी-सीरिजने तब्बल 50 वर्षांसाठी मिळवल्याची माहितीही यापूर्वी समोर आली होती. या कराराची प्रक्रिया रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या माध्यमातून झी म्युझिक कंपनीने पूर्ण केल्याचे वृत्त आहे. ‘किंग’मध्ये शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन, जयदीप अहलावत, अनिल कपूर यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

follow us