सिंहगडावर सुप्रिया सुळेंकडून स्वच्छता अभियान; पर्यटकांना केलं आवाहन

खासदार सुप्रिया सुळेकंडून सिंहगडावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

सिंहगड पुणे शहरापासून जवळ असल्याने येथे सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची गजबज असते. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात कचराही होत असतो.

किल्ला साफ ठेवण्यासाठी स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

सुप्रिया सुळे यांच्या सोबत त्यांच्याटीमकडून गडावरील सर्व प्लॅस्टिक व इतर कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली.

गड प्लॅस्टिक तसेच कचरामुक्त ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. असं सुळे यांनी आपल्या सोशल मीडियावर लिहलं आहे.

यावेळी पर्यटकांना सुप्रिया सुळे यांनी आवाहनही केलं.
