दीपिका ते नर्गिस फाखरी ‘या’ अभिनेत्रींनी त्यांच्या पदार्पणातून केली ब्लॉकबस्टर ओपनिंग, पाहा फोटो

ग्लॅमरस आणि बॉलीवूड सारख्या चित्रपटांच्या दुनियेत पाऊल ठेवणं कोणत्याही नवोदित कलाकारांसाठी त्रासदायक ठरू शकतं. अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी केवळ आव्हान स्वीकारली नाही तर त्यांच्या बॉलीवूड पदार्पणाने ब्लॉकबस्टर हिट्स दिले आहेत.

अनुष्का शर्माने 'रब ने बना दी जोडी' या तिच्या पदार्पणाच्या चित्रपटाने तिचा पहिला बॉक्स ऑफिस ब्लॉकबस्टर बनवला. 151.60 कोटी रुपयांची अंदाजे कमाई करणारा हा चित्रपट आयकॉनिक ठरला आणि कायम प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला.

सोनाक्षी सिन्हा हिने पहिल्या बॉलीवूड चित्रपट ‘दबंग’द्वारे प्रसिद्धी मिळवली आणि व्यावसायिक हिट म्हणून उदयास आली. जगभरात बॉक्स ऑफिसवर अंदाजे 219 कोटी रुपये कमावून सोनाक्षी सिन्हाने या ॲक्शन-ड्रामाची कथा उलगडली.

नर्गिस फाखरीचा बॉलिवूड प्रवास हा अगदीच धमाकेदारपणे सुरू झाला यात शंका नाही ! रॉकस्टार सारख्या या कल्ट क्लासिक चित्रपटामुळे ही अभिनेत्री प्रसिद्धझोकात आली जिने तिला 'रॉकस्टार' गर्ल म्हणून ओळखले गेलं. नवोदित असूनही नर्गिसच्या उत्कृष्ट अभिनयाने तिने सगळ्यांची मन जिंकून घेतली. 108.71 कोटी रुपयांची अंदाजे कमाई करणाऱ्या या चित्रपटाने नर्गिसची अभिनय विश्वात नवी ओळख संपादन करून दिली.

विद्या बालनने 'परिणिता' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि ती एक मुख्य अभिनेत्री आहे हे सिद्ध केले. या चित्रपटाने विद्याच्या अभिनय कौशल्यावर प्रकाश टाकला आणि बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली.
