Star Kids : खुशी ते सुहाना 2023 मध्ये स्टार किड्सची बॉलिवूडमध्ये एंन्ट्री, पाहा फोटो

- 2023 हे फक्त ब्लॉकबस्टर चित्रपटांच राहिलं नाही तर हे वर्ष बॉलिवूडमध्ये नव्या चेहऱ्यांचं पदार्पण होणारं वर्ष ठरलं आहे कोणकोणते आहेत हे चेहरे पाहुयात

पहिली आहे ती म्हणजे अली जेह अग्नीहोत्री ही बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या बहिणीची मुलगी म्हणजेच त्याची भाची आहे. तसेच ती अलविरा खान अग्नीहोत्री आणि अतुल अग्नीहोत्री यांची मुलगी आहे. नुकताच तिने फर्रे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

त्यानंतर श्रीदेवीची दुसरी मुलगी आणि जानवी कपूरचे लहान बहीण खुशी कपूर हिने देखील बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. द आर्चीज या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली.

त्यानंतर बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलीने म्हणजे सुहाना खान हिने देखील द आर्चीज याच चित्रपटांमधून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.

तर वेदांग रैना याने देखील याच चित्रपटातून अभिनयासाह गायनामध्ये देखील पदार्पण केलं आहे. तो देखील इतर स्टारकिड्सला चांगली टक्कर देताना दिसत आहे.
