Shilpa Shetty Photo : ‘गणपती बाप्पा’चे शिल्पा शेट्टीच्या घरी आगमन, हसतमुखाने केलं गणरायाचं स्वागत

Shilpa Shetty Ganesh Chaturthi Photo : फिल्मस्टार शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) प्रत्येक सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करते. इतर सणांप्रमाणेच तिच्या घरी दरवर्षी गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा केला जातो.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिल्पा गणपतीची मूर्ती आणायला गेली होती. ती अतिशय सुंदर गणपतीची मूर्ती घेऊन घरी आली.

मूर्ती घरी आणतानाची शिल्पा शेट्टीची छायाचित्रे समोर आली आहेत. यावेळी ती हसतमुखाने गणपतीची मूर्ती घरी आली.

बाप्पाला घरी घेऊन येतांना शिल्पाच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसत होता.

शिल्पा मूर्ती आणायला गेली तेव्हा चाहत्यांची आणि फोटोग्राफर्सची एकच गर्दी झाली होती.
