रेश्माच्या हातावर सजली मेहंदी, फोटो एकदा पाहाच!

- काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री रेश्मा शिंदेचं केळवण देखील पार पडलं होतं. रेश्माच्या घरी आता लगीनघाई सुरू झालीय.
- मेहंदी सोहळ्यासाठी रेश्मा खास पारंपरिक लूकमध्ये दिसली. हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत तिने ‘माझी मेहंदी’ असं कॅप्शन दिलंय.
- Reshma Shinde Mehendi Ceremony Photos Viral : मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदे छोट्या पडद्यामुळे घराघरांत पोहोचली आहे. ती आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
- रेश्माच्या हातावर मेहंदी सजली आहे. तिच्या मेहंदीच्या डिझाईनमध्ये सनई-चौघडे, लग्नगाठ, नवरा-नवरीची प्रतिमा पाहायला मिळतेय.
- नुकतीच रेश्माची मेहंदी सेरेमनी देखील पार पडली आहे. तिच्या हातावरच्या मेहंदीच्या डिझाइनने मात्र सर्वांचं लक्ष वेधलंय.
- रेश्माने तिच्या मेहंदीत 29 नोव्हेंबर लिहून घेतलंय. ही तिच्या लग्नाची तारीख असल्याचं समजतंय.