Photos : बॉलिवूडकरांकडून ‘वर्षा’च्या गणपतीचं दर्शन पाहा फोटो…

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पांची स्थापना केली आहे. त्यासाठी अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या आहेत.

त्यामध्ये शनिवारी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं.

त्यानंतर आता बॉलिवूडच्या कलाकारांनी या गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या आहेत.

त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांसोबत फोटो देखील काढले.

तसेच यावेळी ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, अर्जुन रामपाल यांनी टाळ वाजवत भजनात दंग झाल्याचं पाहायला मिळालं.

यामध्ये मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील ठेका धरला होता.

यामध्ये ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंसह अनेक अभिनेत्री देखील उपस्थित होत्या. तर यावेळी बॉलिवूडचे सुपरस्टार सलमान खान आणि शाहरूख खान यांनी एकत्र हजेरी लावली होती.
