Photos : कस्तुरी मालिकेमध्ये नव वळण; कस्तुरी कुबेरांची सून होणार?

कलर्स मराठीवरील कस्तुरी मालिका काही दिवसांतच लोकप्रिय झाली आहे. यामध्ये अभिनेत्री एकता लब्दे आणि जीव झाला येडापिसा मालिकेतील शिवा म्हणजे अशोक फळदेसाई यांच्या मुख्य भूमिका आहेत.

या मालिकेमध्ये या दोघांची जोडी भलतीच लोकप्रिय होत आहे. कस्तुरी हे पात्र एका जबाबदार बहिणीची भूमिका साकारत आहे. तर समर हा एक महत्त्वकांक्षी, काहीसा स्वार्थी पण काहीतरी चांगल करण्याची इच्छा असलेला तरूण दाखवण्यात आला आहे.

या दोघांमध्ये नात कसं निर्माण होणार असा प्रश्न असताना मालिकेत आता एक रंजक वळण आलं आहे. त्यामुळे हा ट्विस्ट पाहायला सर्वांना उत्सुकता आहे.

कस्तुरीच्या वडिलांवरील कर्जाची परतफेड म्हणून कस्तुरीला मनाविरूद्ध लग्न करावे लागणार आहे. मात्र त्यावर समर पर्याय काढणार का?

त्यात आता आगामी भागामध्ये कस्तुरीशी कोणीही लग्न करायला तयार नाही. त्यावेळी ही जबाबदारी समर ही जबाबदारी घेऊन कस्तुरीशी लग्न करणार का? हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.
