प्रथमेश परबची लगीनघाई! रिअल लाइफ प्राजूसोबत थाटात पार पडलं दगडूचं केळवण

- प्रथमेश परबने होणाऱ्या पत्नीसोबतचा केळवणाचा फोटो शेअर करत खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने लिहिलं आहे,”#pratija चं ठरलंय हा! बाकी तारीख लवकरच कळवतो. तारीख खूपच स्पेशल आहे.
- दगडूला अखेर खऱ्या आयुष्यातील प्राजु भेटली आहे. प्रथमेश परब लवकरच बोहल्यावर चढणार आहे.
- नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा”. या पोस्टवर यंदा कर्तव्य आहे, केळवण स्टोरीज, लग्न, साखरपुडा, तयारी सुरू असे हॅशटॅगही त्याने दिले आहेत.
- प्रथमेश परबच्या गर्लफ्रेंडचं नाव क्षितिजा घोसाळकर आहे. आपल्या होणाऱ्या पत्नीबद्दल बोलताना प्रथमेश परब म्हणाला,”कोटक फाऊंडेशनच्या उन्नती या एनजीओमध्ये क्षितिजा काम करते.
- चाहत्यांना आता प्रथमेशच्या लग्नाची प्रतीक्षा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.