रामचरणने पत्नीसह घेतली मुख्यमंत्री शिंदेच्या कुटुंबाची भेट! पाहा फोटो…

साऊथ सुपरस्टार रामचरण याने पत्नी उपासना हिच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

यावेळी शिंदे परिवाराने त्यांचं पारंपारिक पद्धतीने स्वागत केलं.

शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी रामचरणशी बातचीत केली.

तर शिंदे यांची सून वृषाली यांनी अस्सल मराठमोळ्या पद्धतीने हळदी कुंकू लावत रामचरणची पत्नी उपासना हीचं स्वागत केलं.

या भेटीमध्ये दोन्ही परिवारांनी एकमेकांना भेटवस्तू दिल्या.
