Sai Tamhankar झळकणार नागराज मंजुळेच्या वेब सीरिजमध्ये; चित्रपटाचं पोस्टर समोर

2024 वर्ष हे सई ताम्हणकरसाठी (Sai Tamhankar) खरंच खास आहे.

अमेझॉन प्राईमने “मटका किंग” (Mataka King) ची अधिकृत घोषणा करून सईदेखील या खास प्रोजेक्टचा भाग असल्याचं सांगितलं आहे.

संपूर्ण जगाला ” सैराट ” करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजिते फिल्ममेकर, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ” मटका किंग ” मध्ये सई मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

” मटका किंग” च शूटिंग काही दिवसापूर्वी सुरू झाल्याचं देखील या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.
