Sharvari Wagh Perfect outfits for athleisure game : रायझिंग स्टार शर्वरीने सोशल मीडियावर आपल्या ‘मंडे मोटिवेशन’ सीरिजद्वारे धुमाकूळ घातला. तीतिच्या एथलीजर फॅशनने इंटरनेटवर खळबळ उडवली आहे. फ्रेश आणि युथफुल फॅशनसाठी प्रसिद्ध असलेल्या शर्वरीच्या आऊटफिट्समध्ये स्लीक सिल्हुएट्स, बोल्ड रंग आणि ट्रेंडी कट्सचा समावेश आहे. जिममध्ये असो, बीचवर असो, किंवा पेडल खेळत असो…शर्वरीचा एथलीजर फॅशन एक तगडा लाइफस्टाइल स्टेटमेंट आहे.
पेडलच्या खेळात स्टाइल दाखवत शर्वरी पेडल खेळत असताना ब्रीदेबल फॅब्रिक आणि फ्लॅटरिंग फिट असलेले आऊटफिट परिधान करते. तिचा हा स्लीक एथलीजर लुक एकदम कम्फर्टेबल आहे आणि वर्कआउटसाठी प्रेरणा देणारा आहे.
जिम बॉल वर्कआउटमध्ये ताकदीने रिंगणात जिममध्ये चांगल्या प्रकारे वर्कआउट करण्यासाठी स्पोर्ट्स ब्रा आणि ट्रॅकसूट परिधान करणे बेस्ट आहे. आपल्या फिटनेसची झलक दाखवत शर्वरीची रिफ्टेड अॅब्स दिसून येते, जी तिच्या एथलीजर लुकची खास ओळख आहे.
बॉक्सिंग सेशनमध्ये बीस्ट मोड बॉक्सिंग सेशन दरम्यान परफेक्ट फिट असलेल्या स्पोर्ट्स टाइट्सने मुक्तपणे मूव्हमेंट करता येते. तिच्या फॅन्सना तिचा हॉट आणि फियरलेस लुक आवडतो आहे. फिटनेस फॅशनमध्ये स्टाइलचा स्पर्श देऊन हॉटनेसची झलक पाहिजे असेल, तर हे परफेक्ट आहे.
बीच रनसह दिवसाची उत्तम सुरुवात बीचवरचा चांगला वर्कआउट एक स्टायलिश को-ऑर्डशिवाय अपूर्ण आहे! फॅन्सना ‘क्रश’ बनवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या शर्वरीच्या या लुकमुळे बीचवर रनिंगसाठी एक परफेक्ट एथलीजर लुक मिळतो.’