अक्षय्यतृतीयेनिमित्त 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य; श्री गणेश-देवी शारदेचा खास विवाहसोहळा पाहा फोटो

अक्षय्यतृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.

त्याचबरोबर श्री गणेश आणि देवी शारदा यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्यतृतीयेच्या मंगलदिनी गणरायाचे दर्शन व्हावे यासाठी भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळा तर्फे अक्षय्यतृतीयेनिमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी देसाई आंबेवालेचे संचालक मंदार देसाई यांच्यावतीने हा नैवेद्य देण्यात आला.

दुपारी 12 वाजून 41 मिनिटांनी भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह म्हणजेच शारदेश मंगलम् सोहळा थाटात पार पडला.
