Photo’s : दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणारी समंथा आज करतीय इंडस्ट्रीवर ‘राज’

समंथा रुथ प्रभू ही आता केवळ दक्षिणेतीलच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनेत्रीने मनोज बाजपेयीसोबत 'फॅमिली मॅन 2' या वेब सीरिजमध्ये तिच्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांची मने जिंकली होती. त्याच वेळी, अभिनेत्री तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील खूप चर्चेत असते.

समंथाने साऊथ स्टार नागा चैतन्यशी लग्न केले पण त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यामुळे ही अभिनेत्री बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती.

आज सामंथा करोडोंची मालकिन आहे, पण तिच्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा तिला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कधीकधी अभिनेत्री दिवसभरात पोटभर जेवणही करू शकत नव्हती. याचा खुलासा स्वत: अभिनेत्रीने तिच्या मुलाखतींमध्ये केला आहे.

2018 मधील तिच्या संघर्षाच्या टप्प्याची आठवण करून देताना समंथा म्हणाली, 'जेव्हा मी नोकरीच्या शोधात होते, तेव्हा मी दोन महिने दिवसातून एकदाच जेवत असे.. माझ्या उच्च शिक्षणासाठी पालकांकडे पैसे नव्हते. पण मी हार मानली नाही..आणि मेहनतीने माझी स्वप्ने साकार केली...'
