New Zealand Hostel Fire : न्यूझीलंडमध्ये वसतिगृहाला भीषण आग, 10 जणांचा मृत्यू

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 16T110632.293

New Zealand Hostel Fire : न्यूझीलंडमधील वेलिंग्टनमध्ये चार मजली हॉस्टेलला आग लागून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेची भीषणता बघता मृत्युची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

प्रकाशित वृतामनुसार, या वसतिगृहाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. यात 10 जणांच्या मृत्यू झाल्याची पुष्टी झाल्याचे देशाचे पंतप्रधान ख्रिस हिपकिन्स यांनी दिली आहे. परंतु, हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

न्यूझीलंडमधील वेलिंग्टन येथे लोफर्स लॉज नावेचे चार मजली वसतिगृहात आहे. येथील तिसऱ्या मजल्यावर अचानक आग लागली. ज्यावेळी आग लागली तेव्हा आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी इमारतीमध्ये कोणत्याही प्रकारची साधनं उपलब्ध नव्हते. ज्यावेळी आग लागली त्यावेळी वसतिगृहात साधारण 52 लोक उपस्थित होते. त्यातील 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काहीजण अद्यापही बेपत्ता आहेत.

Tags

follow us