अमेरिकेत दोषीला मृत्यूदंड; आठ वेळा हात अन् पायाची नस शोधली पण..,
Death Penalty : अमेरिकेत पाच जणांच्या हत्येप्रकरणी एका व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा (Death Penalty) सुनावण्यात आली. त्याला विषारी इंजेक्शन देऊन मृत्यूदंड देण्याची शिक्षा सुनावण्यात आली खरी मात्र, त्याची ही शिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचं कारण म्हणजे संबंधित दोषीची नस तब्बल आठ वेळा तपासली मात्र सापडण्यात वैद्यकीय पथक अपयशी ठरल्याने शिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
कोटक यांच्या खासदारकीला सोमय्यांचा खोडा; दोघांच्या वादात आमदाराला लागणार लोकसभेची लॉटरी?
पाच जणांची हत्या केल्याप्रकरणी थॉमस क्रीचला लीथल हा मागील 43 वर्षांपासून तुरुंगातच आहे. त्याला विषारी इंजेक्शन देऊन मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर वैद्यकीय पथक त्याला विषारी इंजेक्शन देण्यासाठी गेले असता, त्याची एकही नस सापडली नाही. वैद्यकीय पथकाने हात आणि पायाच्या नसांची तब्बल 8 वेळा तपासणी केली मात्र, काही केल्या नस सापडली नाही. जवळपास एक तास पथकाकडून ही प्रक्रिया सुरु होती.
तो दोषी कोण?
दोषी थॉमस क्रीचला लीथल असं त्याचं नाव असून त्याचं वय 73 आहे. 1981 साली पाच जणांच्या हत्येप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते. तेव्हापासून तो 43 वर्षे तुरुंगातच आहे.
विषारी इंजेक्शन दिल्यानंतर काय होतं?
याआधी डेनिस मॅकगुयर नामक दोषीला ही ओहायो तुरुंगात मृत्यूदंड देण्यात आला होता. 16 जानेवारील 2014 रोजी त्याला ही शिक्षा दिली. डेनिस याला चेंबरमधील पलंगावर झोपवलं, त्यानंतर त्याचे हात पाय शरीर बांधण्यात आलं होतं. सकाळी 10 : 27 च्यावेळी त्याला विषारी इंजेक्शन देण्यात आलं होतं. त्यानंतर अवघ्या तीन मिनिटानंतर म्हणजे 10 : 30 वाजता डेनिसचे शरीर वेगाने उडू लागले, तोंडातून बुडत असल्याचा आवाज येऊ लागला. वेगावेगात शरीर बेडवर उडत होतं. त्यानंतर 10 : 53 च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. डेनिसचा मृत्यू अवघ्या 26 मिनिटांत झाला होता.
दरम्यान, आधीच्या काळात देत असलेल्या शिक्षेंमध्ये गॅस, इलेक्ट्रिक शॉक किंवा फाशीमुळे ही वेगळी पद्धत अधिक मानवी मानली जात आहे. विषारी इंजेक्शनमध्ये वापरल्या जाणाऱ्या एका औषधामुळे ज्या दोषीला हे विषारी इंजेक्शन देण्यात येतं त्याला खोल बेशुद्धी येते. बेशुद्धी आल्यानंतर मरणाऱ्या व्यक्तीला वेदना होत नाहीत.