‘भारत जोडो यात्रा’ थांबवण्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्रावर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल

WhatsApp Image 2022 12 21 At 3.12.46 PM

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना कोविड प्रोटोकॉलविषयी लिहिलेल्या पत्रावर काँग्रेसकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय.

आरोग्यमंत्र्यांच्या या पत्रावरुन काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. भारत जोडो यात्रा पाहून मोदी सरकार जळत आहे. सर्वसामान्यांचं लक्ष वळवण्यासाठी ते अनेक समस्या निर्माण करताहेत.

भाजपला विचारायचं आहे की, गुजरात निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी कोविड प्रोटोकॉलचे सर्व नियम पाळले का? पंतप्रधान मोदींनी मास्क घालून घरोघरी प्रचार केला होता का? मला वाटतं, मनसुख मांडविया यांना राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आवडत नाही, पण लोकांना ती आवडली आहे. लोक यात गुंतत आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

याशिवाय, काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सरकारला कोविड धोक्यासाठी संसदेचं अधिवेशन थांबवणार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी नुकतंचं राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहिलं, त्या पत्रात त्यांनी भारत जोडो यात्रेत कोविड नियमांचं पालन करावं किंवा यात्रा पुढं ढकलण्यास सांगितलं होतं.

पत्रामध्ये आरोग्यमंत्र्यांनी भारत जोडो यात्रेतून कोविडचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली आहे. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत कोविड मार्गदर्शक तत्त्वांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आरोग्यमंत्र्यांनी पत्रात सांगितले आहे.

Tags

follow us