असीम मुनीरच्या शिफारशीनंतर ट्रम्प यांना खरचं नोबेल पुरस्कार मिळणार?; नियम काय सांगतो?

  • Written By: Published:
असीम मुनीरच्या शिफारशीनंतर ट्रम्प यांना खरचं नोबेल पुरस्कार मिळणार?; नियम काय सांगतो?

Pakistan Army Chief Asim Munir Nominate Donald Trump Name For Nobel Prize What Are The Rules : पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचे अमेरिकेवरील प्रेम वाढत असतानाच मुनीर यांनी ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळावा अशी शिफारस केली आहे. मुनीर यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याबद्दल ट्रम्प (Donald Trump) यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला पाहिजे असे म्हटले आहे. मात्र, मुनीर (Asim Munir) यांच्या शिफारसीनंतर ट्रम्प यांना खरचं नोबेल पुरस्कार मिळू शकतो का? असा प्रश्न यामुळे अनेकांच्या मनामध्ये उपस्थित झाला आहे. त्यामुळे नोबेल पुरस्कार मिळण्यासाठीचे नियम नेमके काय याबद्दल जाणून घेऊया…

सरकारविरोधात आंदोलन करणं भोवलं; नोबेल विजेते कार्यकर्त्याला 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

2020 मध्ये ट्रम्प झाले होते नॉमिनेट

याआधी 2020 मध्येही डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते. खरंतर, त्यावेळी नॉर्वेच्या एका खासदाराने इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील ऐतिहासिक शांतता करारात त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी त्यांचे नाव सुचवले होते. पण तेव्हा ट्रम्प यांना नोबेल मिळू शकले नाही. जर ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला तर, ते नोबेल मिळवणारे अमेरिकेचे पाचवे राष्ट्रपती असतील. पाकिस्तान आणि भारत यांच्यात मध्यस्थी करण्यापूर्वी ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामध्ये ते अयशस्वी झाले. त्यानंतर आता ट्रम्प मध्य पूर्वेत शांतता राखण्याचाही प्रयत्न करत आहेत.

तुम्ही हिंदूंना का शिवीगाळ करता? जावेद अख्तर पाक लष्करप्रमुखांवर संतापले

नोबेल पुरस्कारासाठीचे नियम नेमके काय?

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शांतता, वैद्यकशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दरवर्षी नोबेल पुरस्कार (Nobel Prize) दिला जातो. सहसा हा पुरस्कार संयुक्तपणे दिला जातो. नोबेल कोणत्याही संस्थेला किंवा संघटनेलादेखील दिला जाऊ शकतो. दरवर्षी वेगवेगळ्या संस्थांकडून त्याची निवड केली जाते. कोणतीही व्यक्ती स्वतःहून यासाठी अर्ज करू शकत नाही. हा पुरस्कार केवळ आमंत्रणाद्वारे (इनविटेशन) नामांकित केला जातो. त्यासाठी एक पात्र नॉमिनेटरच यासाठी एखाद्याला नॉमिनेट करू शकतो. त्यामुळे आता ट्रम्प यांना नोबेल मिळतो की नाही हे नॉर्वेजियन नोबेल समितीवर अवलंबून असेल.

नोबेल पुरस्काराचे नियम:

पात्रता : जिवंत व्यक्ती आणि सक्रिय संस्था, ज्यांनी संबंधित क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिले आहे, त्या पुरस्कारासाठी पात्र आहेत.

नामांकन : पुरस्कार समिती सदस्यांकडून आणि इतर पात्र व्यक्तींकडून नामांकन मागवले जाते.

निवड : पुरस्कार समिती शिफारसींच्या आधारावर विजेत्यांची निवड करते.

पुरस्कार :
पुरस्कारात एक सुवर्णपदक, प्रशस्तिपत्र आणि मोठी रक्कम दिली जाते.

विजेत्यांची संख्या : एका क्षेत्रात जास्तीत जास्त तीन व्यक्तींना पुरस्कार विभागून दिला जाऊ शकतो.

शांतता पुरस्कार : शांतता पुरस्कारासाठी एखाद्या व्यक्तीसोबत एखादी संस्था देखील पात्र ठरते.

स्विकारणे किंवा नाकारणे : विजेत्याला पुरस्कार स्विकारणे किंवा नाकारणे, दोन्ही पर्याय उपलब्ध असतात.

Iran Vs Israel : अरब, मंगोल ते इराकपर्यंत, इराणचा इतिहास रक्तपाताने भरलेलाच….

नोबेल पुरस्काराचे विविध क्षेत्रांतील नियम काय?

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरशास्त्र/वैद्यकशास्त्र, आणि साहित्य या क्षेत्रांतील पुरस्कारांसाठी रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेस, स्वीडिश अकादमी आणि कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट निवड समिती म्हणून काम करतात. शांतता पुरस्कारासाठी नॉर्वेजियन नोबेल समिती निवड करते.
तर, स्वीडनची मध्यवर्ती बँक, रिक्सबँक, अर्थशास्त्रातील कार्यासाठी नोबेल पुरस्कार प्रदान करण्यासाठी काम करते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube