China : चीनमध्ये खळबळ! आता संरक्षण मंत्रीच झाले बेपत्ता; कारण काय?

China : चीनमध्ये खळबळ! आता संरक्षण मंत्रीच झाले बेपत्ता; कारण काय?

China : चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू (Li Shangfu) अचानक गायब झाले आहे. यामुळे फक्त चीनच (China) नाही तर जगभरात खळबळ उडाली आहे. मागील दोन आठवड्यांपासून ते गायब झाले आहेत. त्यामुळे आता यामागे नेमके काय घडले, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या सांगण्यावरून तर त्यांना गायब केले नाही ना अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. चीनी विदेश मंत्रालयाने यावर काहीच उत्तर दिलेले नाही. यानंतर आता अशा चर्चा सुरू झाल्या आहेत की रक्षामंत्र्यांना पदावरून हटविण्यात आले आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

Tharman Shanmugarratnam : सिंगापूरमध्ये भारतीय वंशांचे राष्ट्राध्यक्ष, थर्मन षण्मुगररत्नम यांनी घेतली शपथ

चीनच्या (China) सैन्याचा शस्त्र पुरवठा विभाग सांभाळणाऱ्या ली शांगफू यांना नुकतेच प्रमोशन देऊन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्त केले होते. याआधी शी जिनपिंग यांच्या आदेशावरून विदेश मंत्र्यांनाही पदावर हटविण्यात आले होते. चीनी विदेश मंत्री सुद्धा अनेक दिवस बेपत्ता होते. फायनान्शियल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अमेरिकी सरकारला वाटते की मंत्री ली यांची चौकशी करण्यासाठी त्यांना कुठेतरी नेण्यात आले आहे. मात्र कोणत्या कारणामुळे त्यांची चौकशी केली जात आहे याची माहिती मिळू शकली नाही.

याआधी चीनचे विदेश मंत्री किन गँग यांना जुलै महिन्यात पदावरून हटविण्यात आले होते. किन यांनी फक्त सात महिनेच विदेश मंत्रीपद सांभाळले. त्यानंतर आता ली शांगफू अचानक गायब झाले आहेत. शी जिनपिंग यांनी चीनची (China) सेना पीएलए मध्ये मोठे सफाई अभियान सुरू केले आहे. नेमक्या याच काळात ली गायब झाले आहेत. रॉकेट फोर्सच्या दोन अधिकाऱ्यांनाही डच्चू देण्यात आला आहे.

मंत्री गायब होण्यात जिनपिंग यांचा हात ?

अशा पद्धतीने वरिष्ठ मंत्री गायब होत असल्याने चीन (China) सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या आदेशामागे नेमके कोण आहे याचा खुलासा झाला नसला तरी जिनपिंग यांच्याच आदेशाने हे सगळे होत असल्याची चर्चा सुरू आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या या सगळ्या घडामोडींवर अमेरिकाही बारीक नजर ठेऊन आहे. त्यामुळेही दोन्ही देशातील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता दिसत आहे.

दुसऱ्या ग्रहावरही जीवन? NASA च्या रिपोर्टमध्ये नेमकं काय?

परराष्ट्र मंत्रीही झाले होते बेपत्ता

चीनचे परराष्ट्र मंत्री गेल्या चार आठवड्यांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या अचानक गायब होण्याने चीनमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पण चीन सरकार मौन बाळगून आहे. चीनच्या अशा मौनाला मोठा इतिहास आहे. चीनमध्ये राजकारणी आणि सेलिब्रिटी गायब होणे हे सामान्य झाले आहे. आतापर्यंत अनेक कलाकार, सेलिब्रेटी, उच्च अधिकारी, राजकीय नेते आणि पत्रकार बेपत्ता झाले आहेत. यातील अनेक लोक नंतर सापडले पण काही लोक बेपत्ताच राहिले. 2012 मध्ये राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी शी जिनपिंग हे दोन आठवडे बेपत्ता झाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube