फडणवीसांना जपानमध्येही मुंबई-पुण्याचा फील; मराठी भाषिकांच्या स्वागताने भारावले

  • Written By: Published:
फडणवीसांना जपानमध्येही मुंबई-पुण्याचा फील; मराठी भाषिकांच्या स्वागताने भारावले

टोकियो : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर असून, टोकीयो विमानतळावर मराठी बांधवांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या या स्वागताने फडणवीस भारावले आणि त्यांनी जपानमध्ये येऊनही आपल्याला मुंबई-पुण्याचा फील येत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. या दौऱ्यात फडणवीस जपानमधील अनेक मंत्र्यांच्या भेटी घेणार आहेत.

शिंकमसेन बुलेट ट्रेवमधून लुटला प्रवासाचा आनंद

जपानमध्ये दाखल झाल्यानंतर फडणवीसांनी शिंकमसेन या बुलेट ट्रेनमधून प्रवास करण्याचाही आनंद लुटला. टोकिओ विमान तळावर उतरल्यानंतर फडणवीसांनी स्वागतासाठी आलेल्या मराठी बांधवांशी संवाद साधला. ते म्हणाले की, तुमच्या स्वागतामुळे मी भारावून गेलो असून, तुमच्यामुळे मला जपानमध्ये नव्हे तर, मुंबई-पुण्यातचं उतरलो आहे असा फील येत आहे. त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. तुमच्या सारख्या मराठी भाषा, मराठी धर्म आणि महाराष्ट्राचा गौरव हा सातासमुद्रा पलिकडे सर्व देशांमध्ये जिवंत ठेवलेला आहे. त्याबद्दल फडणवीसांनी उपस्थितांचे आभारही मानले.

फडणवीसांच्या या दौऱ्यात भारत आणि जपान याच्यातील मैत्रीचा नवा अध्यय सुरू होणार असून, उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील काही प्रकल्प, सामंजस्य करार आणि सहकार्य आदी बाबींसाठी हा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. याशिवाय जायकाकडून (जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी) मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य मिळवून विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठीदेखील राज्य सरकार प्रयत्नशिल आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube