आधी झेलेन्स्की आता रामाफोसा! व्हाइट हाउसमध्ये पुन्हा हायहोल्टेज ड्रामा; वादाचं कारणही धक्कादायक..

आधी झेलेन्स्की आता रामाफोसा! व्हाइट हाउसमध्ये पुन्हा हायहोल्टेज ड्रामा; वादाचं कारणही धक्कादायक..

Donald Trump News : दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपती सिरिल रामाफोसा सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान व्हाइट हाउसमध्ये डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि रामफोसा या दोन्ही नेत्यांची बैठक झाली. पण ही बैठक काही साधी नव्हती. काही दिवसांपूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या सोबत जी बैठक झाली होती त्याची आठवण या निमित्ताने झाली. या बैठकीत ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती. यावेळी झेलेन्स्कींच्या जागेवर रामाफोसा होते.

या बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी श्वेत शेतकऱ्यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणी तोडगा काढण्यात दक्षिण आफ्रिका अपयशी ठरल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. येथील लोक सुरक्षिततेसाठी देश सोडून जात आहेत. त्यांच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. इतकेच नाही तर काही प्रसंगात तर त्यांना ठार मारलं जात आहे असे आरोप ट्रम्प यांनी केले.

मोठी बातमी! अमेरिकेतील गोळीबारात इस्त्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू; हल्लेखोराच्या घोषणा

रामाफोसा यांनी मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचे आरोप फेटाळून लावले. या गोष्टींचा आम्ही विरोध करत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, असं वाटत होतं की ट्रम्प मनाशी काहीतरी ठरवूनच या बैठकीला आले होते. कारण या बैठकीत एक व्हिडिओ दाखवण्यात आला. ट्रम्प यांच्या या आक्रमकतेवर रामाफोसा काहीसे अस्वस्थ झाल्याचे दिसून आले. त्यांनी सांगितलं की या व्हिडिओत जे काही दाखवण्यात आलं आहे ते सरकारी धोरणाचे प्रतिनिधीत्व करत नाही.

व्हाइट हाउसमधून बाहेर पडताच रामाफोसा म्हणाले बैठक चांगली झाली. या बैठकीत गोल्फच्या मुद्द्यावर चर्चा झाली. परंतु, या बैठकीच्या ज्या बातम्या बाहेर येत आहेत त्यानुसार बैठकीत वादाचे प्रसंग घडले. या बैठकीत ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेत श्वेतवर्णीय शेतकऱ्यांच्या हत्या होत असल्याचा आरोप केला. या दरम्यान ट्रम्प यांच्या ओवल ऑफीसमधील लाइट्स कमी करण्यात आले. यानंतर येथे एका राजकीय व्यक्तीचा व्हिडिओ दाखवण्यात आला. या व्हिडिओत शेतकऱ्यांना मारुन टाका यांसारख्या घोषणा दिल्या जात होत्या.

या बैठकीत ट्रम्प यांनी वर्तमानपत्रातील काही रिपोर्ट्स दाखवले. ज्यात म्हटले आहे देशातील श्वेतवर्णीय शेतकऱ्यांनी मोठ्या संकटाचा सामना केला आहे. ट्रम्प यांनी याआधी दक्षिण आफ्रिकेला मिळणारी सर्व अमेरिकी मदत बंद केली होती. दक्षिण आफ्रिकेतील काही श्वेतवर्णीय शेतकऱ्यांना अमेरिकेत आश्रय दिला होता. आता दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींनाही त्यांनी या मुद्द्याची जाणीव करून दिली.

Jyoti Malhotra : पाकला मदत करणारी ज्योती ​​चारवेळा मुंबईत; लालबागजवळ काढला व्हिडिओ

follow us
  • fb
  • instagram
  • youtube