Donald Trump : ट्रम्प यांचे वजन 10 किलोंनी वाढले; जगातील सर्वात ‘वजनदार’ 5 नेते कोण?

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी इराण युद्धामुळे तर कधी आर्थिक कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत राहतात.

Donald Trump

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी इराण युद्धामुळे तर कधी आर्थिक कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत राहतात. तर आता डोनाल्ड ट्रम्प आपल्या वाढत्या वजनामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. एका अहवालानुसार, व्हाईट हाऊसच्या वैद्यकीय माहितीनुसार, 2023  पासून ट्रम्प यांच्या वजनात लक्षणीय वाढ झाली आहे. 6 फूट 3 इंच उंची असलेल्या ट्रम्प यांचे वजन आता वैद्यकीय भाषेत ‘लठ्ठपणा’ (BMI 30 किंवा त्याहून अधिक) मानल्या जाणाऱ्या मर्यादेच्या जवळ पोहोचले आहे.

ट्रम्प यांचे वाढते वजन

‘वॉशिंग्टन पोस्ट’ आणि अहवालांनुसार मे महिन्यात ट्रम्प यांचे वजन सुमारे 107.9 किलो इतके नोंदवले गेले. तर ऑगस्ट 2023 मध्ये सुमारे 97.5 किलो त्यांचे वजन नोंदवले गेले होते. तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत त्यांचे वजन 23 पाउंड (सुमारे 10.4 किलो) वाढले आहे. 6 फूट 3 इंच उंची आणि 107.9 किलोपेक्षा जास्त वजन यामुळे त्यांचा ‘बॉडी मास इंडेक्स’ (BMI) सुमारे 29.7 इतका होतो. ट्रम्प (Donald Trump) यांच्या डॉक्टरांनी त्यांना जीवनशैलीत सुधारणा करण्याचा, फास्ट-फूडचे सेवन मर्यादित करण्याचा आणि नियमित शारीरिक व्यायाम करण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

सध्याच्या जगातील सर्वाधिक वजन असलेले 5 राजकीय नेते

ट्रम्प यांच्या वाढत्या वजानामुळे सध्या सर्वाधिक वजन असलेल्या 5 नेत्यांची चर्चा देखील सोशल मीडियावर जोराने सुरु झाली आहे. याबाबत देखील काही अहवालात माहिती देण्यात आली आहे.या माहितीनुसार उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग-उन जगातील सर्वाधिक वजन असलेले राजकीय नेते आहे. त्यांचे अंदाजित वजन 130 ते 140 किलोग्रॅमच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते.

किम जोंग-उन – उत्तर कोरिया

दक्षिण कोरियाच्या ‘नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिस’ (National Intelligence Service) च्या अहवालानुसार, 5 फूट 7 इंच उंची असलेल्या किम जोंग-उन यांचे वजन गेल्या काही वर्षांत अति मद्यपान आणि सतत धूम्रपान करण्यामुळे वेगाने वाढले आहे. त्यांची अवाढव्य शरीरयष्टी आणि चालताना होणारा त्रास या गोष्टींमुळे ते अनेकदा आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या चर्चेचा विषय ठरतात. त्यांचे अंदाजित वजन 130 ते 140 किलोग्रॅमच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते.

डोनाल्ड ट्रम्प – अमेरिका

ट्रम्प यांचे अंदाजित वजन 108 ते 115 किलोग्रॅमच्या दरम्यान आहे. 6 फूट 3 इंच उंची असलेले ट्रम्प या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना फास्ट फूडची (विशेषतः गोल्फ कोर्सवरील बर्गर आणि कोका-कोलाची) असलेली आवड सर्वश्रुत आहे.

अलेक्झांडर लुकाशेन्को – बेलारूस

बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांचे अंदाजित वजन 110 ते 115 किलोग्रॅम आहे. 6 फूट 2 इंचांपेक्षा जास्त उंची असलेले बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्या अवाढव्य शरीरयष्टीसाठी आणि अधिक वजनासाठी ओळखले जातात.

व्हिक्टर ऑर्बन – हंगेरी

हंगेरीच्या पंतप्रधानांचे वजन अंदाजे 100 ते 110 किलोग्रॅम दरम्यान असल्याचे मानले जाते.

केंद्र सरकारमध्ये तब्बल 8.23 लाख पदे रिक्त; रेल्वे, संरक्षण विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता-

सिरिल रामाफोसा – दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे वजन अंदाजे 100 ते 105 किलोग्रॅम आहे; तरीही, नियमित सकाळच्या फेरीमुळे (मॉर्निंग वॉक) सक्रिय राहण्याचा ते प्रयत्न करतात.

follow us