Earthquake : तुर्की-सीरीयाच्या सीमेवर आज पुन्हा भूकंपाचे धक्के, तीन जणांचा मृत्यू

Earthquake : तुर्की-सीरीयाच्या सीमेवर आज पुन्हा भूकंपाचे धक्के, तीन जणांचा मृत्यू

अंकारा : तुर्की (Turkey) आणि सीरीया (Syria)पुन्हा एकदा भूकंपाच्या (Earthquake)धक्क्यानं हादरल्याचं पाहायला मिळतंय. तुर्की आणि सीरीया देशाच्या सीमेवर आणखी एक भूकंप झालाय. हा भूकंप 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा असल्याची माहिती समोर आलीय. तुर्कीच्या हाते प्रांतात हे भूकंपाचे धक्के बसले आहेत. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. भूकंप झालेल्या ठिकाणी मदतकार्य सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

एका एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीच्या हाते प्रांतात भूकंपाचे धक्के बसलेत. या भूकंपात तीन जणांचा मृत्यू झालाय. त्यात 213 जण जखमी झाले आहेत. राष्ट्रपती रेसेप तईप एर्दोगन यांनी सोमवारी हाते प्रांताचा दौरा केला. सरकार पुढील महिन्यात भूकंपग्रस्त भागात जवळपास दोन लाख घरांचं काम तातडीनं सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

Sonu Nigam : ठाकरे गटाच्या आमदाराच्या मुलाकडून सोनू निगमला धक्का-बुक्की ? व्हिडीओ व्हायरल

या भागात 14 दिवसानंतर आलेल्या भूकंपात अनेक इमारती कोसळल्या आहेत. भूकंपानंतर मदत आणि बचाव पथकानं भूंकपग्रस्त भागाकडं धाव घेतली आहे. अद्यापही बचावकार्य सुरू आहे. अनेकजणांची कुटूंबं रस्त्यावर आली आहेत. काहींची घरं जमीनदोस्त झाली तर अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाला. अशा इमारतींना धोकादायक इमारती म्हणून घोषीत केले होते. धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना रिलीफ कॅम्पमध्ये पाठवण्यात आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube