नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली-हरियाणात भूकंपाचे धक्के

Clipboard   January 1, 2023 11_04 AM

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने या भूकंपाची तीव्रता मोजली असून याची तीव्रता 3.8 इतकी असल्याचे सांगितले. मात्र या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. विशेष म्हणजे भूकंप झाला, तेव्हा लोक नववर्षाच्या जल्लोषात मग्न झाले होते.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणातील झज्जर येथे होता. त्याची खोली जमिनीपासून 5 किलोमीटर खाली होती. दरम्यान, पहाटे 1.19 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. सद्यस्थितीत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही. गेल्या काही महिन्यांत दिल्लीत अनेकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत.

भूकंपाचे धक्के जाणवल्यास लगेच जमिनीवर बसून आणि डोकं खाली टेकवावं. मजबूत टेबल किंवा फर्निचरच्या आवरणाखाली स्वतःचा बचाव करावा. घरातील वडीलधाऱ्यांची आणि मुलांची विशेष काळजी घ्या, त्यांना प्रोत्साहन द्या आणि बचावाच्या पद्धती सांगून त्यांचे संरक्षण करा. भूकंपाचे धक्के खूप तीव्र असतील तर घरातून बाहेर पडा आणि मोकळ्या मैदानावर किंवा रस्त्यावर पडा, घरातून बाहेर पडण्याचा मार्ग अरुंद असेल आणि दोन्ही बाजूला घरे बांधलेली असतील तर घराबाहेर पडण्याऐवजी घरातच राहा. भूकंपाच्या वेळी काच, खिडकी, पंखा किंवा झुंबर इत्यादी जड आणि पडणाऱ्या वस्तूंपासून दूर राहा. अशा परिस्थितीत संयम बाळगा आणि अफवांकडे लक्ष देऊ नका.

Tags

follow us