पंतप्रधान मोदींना इजिप्तचा सर्वोच्च सन्मान, गेल्या 9 वर्षांतील 13 वा पुरस्कार

पंतप्रधान मोदींना इजिप्तचा सर्वोच्च सन्मान, गेल्या 9 वर्षांतील 13 वा पुरस्कार

PM Modi Egypt Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौरा यशस्वी झाल्यानंतर दोन दिवसांच्या इजिप्त दौऱ्यावर गेले आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना राजधानी कैरोमध्ये इजिप्तचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांनी पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ पुरस्कार प्रदान केला.

‘ऑर्डर ऑफ द नाईल’ हा इजिप्तचा सर्वोच्च सन्मान आहे. द्विपक्षीय बैठकीपूर्वी इजिप्तच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींना प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या भेटीदरम्यान एका महत्त्वाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

गेल्या 9 वर्षांत जगभरातील विविध देशांनी पंतप्रधान मोदींना दिलेला हा 13वा सर्वोच्च राज्य सन्मान आहे. तत्पूर्वी येथे, पंतप्रधानांनी कैरो येथील देशातील 11व्या शतकातील अल-हकीम मशिदीला भेट दिली, जी भारतातील दाऊदी बोहरा समुदायाच्या मदतीने पुनर्संचयित करण्यात आली आहे.

Sanjay Raut : ‘वॅग्नर’सारखाच शिंदे गट भाडोत्री, एक दिवस भाजपलाच.. राऊतांचा हल्लाबोल!

बोहरा समाजाने या मशिदीचा जीर्णोद्धार केला आहे आणि 1980 मध्ये नवीन स्वरूपात लोकांसमोर आली. या बांधकामाची जबाबदारी दाऊदी बोहरा समाजाचे 52 वे मौलवी सय्यदना मोहम्मद बुरहानुद्दीन यांनी घेतली आणि मोहम्मद बुरहानुद्दीन हे भारताशी संबंधित होते.

अल-हकीम मशिदीनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कैरो येथील हेलिओपोलिस वॉर मेमोरियल (युद्ध स्मशानभूमी) ला भेट दिली आणि पहिल्या महायुद्धात सर्वोच्च बलिदान दिलेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी शनिवारी पंतप्रधान मोदींनी राजधानी कैरोमध्ये इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मदबौली यांची भेट घेतली होती. मुस्तफा मदबौली यांनीच पंतप्रधान मोदींचे विमानतळावर स्वागत केले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube