हैदराबादचे आठवे निजाम मुकर्रम जाह यांचे तुर्कीमध्ये निधन
हैदराबाद: हैदराबादचे शेवटचे निजाम उस्मान अली खान यांचे नातू निजाम मीर बरकत अली खान सिद्दीकी मुकर्रम जाह यांचे तुर्कीमध्ये निधन झाले आहे. ते हैदराबादचे आठवे निजाम होते. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. काही दिवसांपासून आजारी असलेले राजकुमार मुकर्रम जाह यांचे शनिवारी रात्री 10.30 वाजता निधन झाले. इस्तंबूल येथील त्यांच्या कार्यालयाने याबाबत माहिती दिली आहे.
हैदराबादचा शेवटचा निजाम उस्मान अली खान याने १७२४ मध्ये सत्ता हाती घेतली. ६ एप्रिल १९६७ रोजी त्यांचा नातू मुकर्रम जाह यांना हैदराबादचा आठवा निजाम घोषित करण्यात आले होते.
मुकर्रम जाह यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्हाला कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, हैदराबादचे आठवे निजाम नवाब मीर बरकत अली खान वालशन मुकर्रम जाह बहादुर यांचे काल रात्री 10.30 वाजता इस्तंबूल येथे निधन झाले.” त्यांची मुले मंगळवारी त्यांचे पार्थिव घेऊन हैदराबादला परतणार आहेत. पार्थिव चौमहल्ला पॅलेसमध्ये नेण्यात येईल आणि विधी पूर्ण केल्यानंतर असफ जही कुटुंबाच्या समाधीवर दफन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
6 एप्रिल 1967 रोजी चौमहल्ला पॅलेसमध्ये मुकर्रम जाहला निजाम आठवा म्हणून स्थापित करण्यात आले. त्यांचे आजोबा निजाम उस्मान अली खान यांनी त्यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली आणि प्रक्रियेत त्यांच्या स्वत: च्या मुलांना बाजूला केले. फ्रान्समध्ये 1933 मध्ये प्रिन्स आझम जाह आणि राजकुमारी दुर्रीशेश्वर यांच्या पोटी जन्मलेले मुकर्रम जाह तुर्कीला जाण्यापूर्वी अनेक वर्षे ऑस्ट्रेलियात राहिले होते.