France Social Media Rules : ऑस्ट्रेलियानंतर आता ‘या’ देशातही 15 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी
France Social Media Rules : काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाने मोठा निर्णय घेत 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घातली आहे.
France Social Media Rules : काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाने मोठा निर्णय घेत 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घातली आहे. तर आता फ्रान्सने देखील 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर पूर्णपणे बंदी घातली आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉनने एक नवीन मसुदा कायदा आणला आहे. या कायद्यानुसार, 1 सप्टेंबर 2026 पासून फ्रान्समध्ये 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया अकाउंट वापरणे बेकायदेशीर असणार आहे. मुलांमध्ये वाढत्या मानसिक आरोग्य धोक्यांमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती फ्रान्स सरकारकडून देण्यात आली आहे.
युनेस्कोच्या (UNESCO) अहवालानुसार, युरोपमधील 40% पेक्षा जास्त किशोरवयीन मुले दररोज तीन तासांपेक्षा जास्त वेळ सोशल मीडियावर (Social Media) घालवतात, ज्यामुळे चिंता, नैराश्य आणि झोपेच्या समस्या वाढतात. फ्रान्सने (France Social Media Rules) आधीच तीन वर्षांखालील मुलांसाठी टॅब्लेटवर बंदी घातली आहे. टेक कंपन्यांना सोशल मीडियाबाबतच्या नवीन नियमांचे पालन करावे लागेल, अन्यथा दंड भरावा लागेल असं फ्रान्स सरकारकडून सांगण्यात आले आहे.
कायद्यातील दोन प्रमुख तरतुदी
- कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने 15 वर्षांखालील अल्पवयीन मुलांना त्यांच्या सेवा देणे हा गुन्हा मानला जाईल.
- आतापर्यंत, फ्रान्समध्ये फक्त प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये फोन वापरण्यास बंदी होती, परंतु आता हायस्कूलमध्येही ते अनिवार्य केले जाईल.
डिजिटल स्क्रीनच्या विषारीपणापासून मुलांना संरक्षण देणे हे त्यांच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे. काही अहवालांनुसार, 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत “डिजिटल कर्फ्यू” लागू करण्याचा विचार केला जात आहे अशी माहिती देखील फ्रान्स सरकारकडून देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कधी ; अजितदादांनी थेट तारीखच सांगितली
नुकतंच ऑस्ट्रेलियाने देखील 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी कायदा मंजूर केला आहे. असा कायदा आणणारा ऑस्ट्रेलिया जगातील पहिला देश आहे.
