Grok AI चा दावा, नेतन्याहू यांचा व्हिडिओ डीपफेक, नव्या दाव्याने चर्चांना उधाण

नेतन्याहू यांच्या अधिकृत X अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. या व्हिडिओमध्ये ते एका कॅफेमध्ये कॉफी घेताना दिसतात.

  • Written By: Published:
Untitled Design 37

Grok AI claims Netanyahu’s video is a deepfake : इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याबाबत सोशल मीडियावर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. नेतान्याहू यांचा मृत्यू झाल्याच्या अफवा व्हायरल होत असतानाच त्यांनी स्वतःचा एक व्हिडिओ जारी केला. मात्र त्या व्हिडिओमध्ये त्यांच्या हाताला सहा बोटे दिसत असल्याचा दावा नेटकऱ्यांनी केल्याने हा व्हिडिओ एआयद्वारे तयार केलेला दीपफेक असल्याचा आरोप करण्यात आला. या वादानंतर इस्रायलने आणखी एक व्हिडिओ जारी करत नेतन्याहू जिवंत असल्याचे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर काही इराण समर्थक हँडल्सकडून नेतन्याहू यांचा इराणच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा केला जात होता. या अफवांना उत्तर देण्यासाठी नेतन्याहू यांच्या अधिकृत X अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. या व्हिडिओमध्ये ते एका कॅफेमध्ये कॉफी घेताना दिसतात. मात्र, व्हिडिओ व्हायरल होताच काही युजर्सनी त्याचे फ्रेम-बाय-फ्रेम विश्लेषण करत अनेक विसंगती दाखवून दिल्या. काही फ्रेममध्ये नेतन्याहू यांच्या ओठांची हालचाल अनैसर्गिक वाटत असल्याचा दावा करण्यात आला.

इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम; राज्यात गॅस टंचाईची भीती, वितरकांना पोलीस संरक्षण

तसेच कपातील कॉफीचे स्तर सतत स्थिर राहणे, आजूबाजूच्या दृश्यातील काही तपशील बदलत नसणे आणि हाताच्या बोटांमध्ये असलेली कथित तांत्रिक चूक यामुळे हा व्हिडिओ बनावट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणाला आणखी वळण मिळाले ते एलोन मस्क यांच्या कंपनीच्या Grok AI चॅटबॉटमुळे. काही युजर्सनी या व्हिडिओच्या सत्यतेबाबत ग्रोकला विचारणा केली असता, या एआय चॅटबॉटने तो 100 टक्के डीपफेक असण्याची शक्यता असल्याचे उत्तर दिल्याचा दावा करण्यात आला.

ग्रोकच्या विश्लेषणानुसार, व्हिडिओमधील लिप-सिंक, कॉफीचा स्थिर स्तर आणि नेतन्याहू यांचा असामान्य कॅज्युअल लूक हे एआयने तयार केलेल्या दृश्यांचे संकेत असू शकतात. या उत्तराचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद अधिकच पेटला.

दरम्यान, इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. अधिकृत निवेदनात, पंतप्रधान पूर्णपणे सुरक्षित असून ते सध्याच्या युद्धस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सोशल मीडियावर पसरत असलेल्या बातम्या या निव्वळ फेक न्यूज आहेत, असे स्पष्ट करण्यात आले. तरीही, नेतन्याहू अद्याप सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नसल्याने आणि आधीच्या व्हिडिओतील कथित तांत्रिक त्रुटींमुळे या प्रकरणाबाबत जागतिक स्तरावर संभ्रम कायम आहे. सोशल मीडियावर मात्र हा मुद्दा एआय, डीपफेक तंत्रज्ञान आणि माहितीच्या विश्वासार्हतेबाबत नव्या चर्चेला तोंड फोडत आहे.

follow us