थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना! पबमध्ये लागलेल्या आगीत 27 जणांचा मृत्यू 60 हून अधिक गंभीर
Bangkok Thailand pub fire थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एका पबमध्ये लागलेल्या आगीमध्ये 27 लोकांचा मृत्यू झाला आहे.
Horrific tragedy in Bangkok Thailand 27 dead and over 60 critically injured in a pub fire : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये आज सोमवारी सकाळी-सकाळी एक भीषण दुर्घटना घडली आहे. एका पबमध्ये लागलेल्या आगीमध्ये 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 60 हून अधिक लोकांची प्रकृती गंभीर आहे. त्या सर्वांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. ही घटना या शहराच्या उत्तर भागामध्ये असलेल्या एका पबमध्ये घडली आहे. या आगीने हळूहळू पूर्ण इमारतीला वेढले आहे. सध्या फायर ब्रिगेडकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे.
या दुर्घटनेनंतर थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चार्नविराकुल यांनी घटनास्थळी भेट दिली, याबाबत सांगताना ते म्हणाले की आग लागल्यानंतर प्रचंड धूर झाला. यामुळे बचाव कार्यात अडथळा आला आहे. तरी देखील बाथरूमच्या मार्गाने 27 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर प्रकृती गंभीर असलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या आग लागल्याच्या घटनेचं कारण समोर आलेले नाही मात्र पोलिसांकडून या प्रकरणी तपास आणि बचावकार्य सुरू आहे.