मृत्युच्या दारातही अमेरिकन पायलट एकटा नाही; इराणच्या डोंगरदऱ्यात सुरूये हायटेक ‘सर्व्हायव्हल गेम’
US Air Force : शत्रूच्या प्रदेशात वैमानिकाचे पहिले प्राधान्य हे नेहमी स्वतःला लपवून ठेवणे' आणि शत्रूच्या तावडीतून सुटणे हेच असते.
Inside Story of US Air Force Survival System : युद्धाच्या मैदानात सर्वात भयानक क्षण तो असतो, जेव्हा करोडो रुपयांचे फायटर जेट शत्रूच्या प्रदेशात कोसळते. नुकतंच इराणमध्ये अमेरिकेचे एक F-15E विमान पाडण्यात आले. यातील दोन वैमानिकांनी उडी मारली, एकाला वाचवण्यात यश आलं, पण दुसरा अजूनही बेपत्ता आहे जो आता इराणच्या झाग्रोस पर्वतरांगांच्या काळोखात शत्रूशी लपंडाव खेळतोय. पण, शत्रूराष्ट्र इराणच्या प्रदेशात एकटा पडलेला अमेरिकन पायलट एकटा नाहीये तर, त्याच्यासोबत आहे अमेरिकन एअर फोर्सची ‘हायटेक सर्व्हायव्हल सिस्टम’. ही सिस्टिम नेमकी काय? याद्वारे अमेरिकन सैनिक किती काळ जिवंत राहू शकतो? त्याबद्दस सोप्या शब्दात जाणून घेऊया…
Iran War : आखातातील युद्धाची रणनीती बदलली; ‘डेटा’ सेंटर्सवरील हल्ल्यामागे इराणचा मेगा मास्टर प्लॅन
शत्रूला चकवा देण्याचे ‘SERE’ प्रशिक्षण
अमेरिकन वैमानिकांना केवळ विमान उडवण्याचे नाही, तर शत्रूला चकवा देण्याचे ‘SERE’ प्रशिक्षण दिले जाते. ही सिस्टिम मुख्यतः Survival (जगणे), Evasion (शत्रूच्या नजरेतून सुटणे), Resistance (पकडले गेल्यास प्रतिकार करणे) आणि Escape (तिथून पळून जाणे). या चार खांबांवर उभी आहे. जेव्हा एखादा पायलट शत्रूच्या हद्दीत कोसळतो, तेव्हा त्याच्याकडे दोनच पर्याय असतात एक म्हणजे शरण जाणे किंवा मरेपर्यंत लढणे. पण अमेरिकन पायलट शरण जात नाहीत. कारण त्यांच्याकडे आहे जगातील सर्वात घातक ‘सर्व्हायव्हल सिस्टीम’
इजेक्शन सीटखाली दडलेली असे ‘लाईफलाईन’
जेव्हा अमेरिकाचा एखादा पायलट विमानातून बाहेर पडतो, तेव्हा त्याच्यासोबत एक ‘सर्व्हायव्हल किट’ असते. इजेक्शनच्या वेळी पॅराशूटसोबत उघडले जाते. यामध्ये संवाद आणि दिशादर्शन साधनांना प्राधान्य दिले जाते; सर्व्हायव्हल रेडिओमुळे बचाव पथकांशी संपर्क साधता येतो, तर कंपास, सिग्नल मिरर आणि जीपीएस बीकन पायलटला त्यांचे स्थान निश्चित करून मैलोन्मैल दूर असलेल्या बचाव पथकाला नेमके लोकेशन सांगते. याशिवाय या कीटमध्ये विशेषतः घनदाट जंगल किंवा रात्रीच्या वातावरणासारख्या कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत, शोध घेणाऱ्या विमानांना किंवा हेलिकॉप्टर्सना आपली उपस्थिती कळवण्यासाठी स्ट्रोब लाईट्स, स्मोक बॉम्ब आणि फ्लेअर्स आहेत.
Iran War Explainer : इराणमध्ये अमेरिकन पायलट अडकला, सुटका होणार की शिक्षा? नियम काय?
अन्न, पाणी आणि वैद्यकीय मदत
अमेरिकेचा बेपत्ता झालेला पायलट इराणच्या झाग्रोस पर्वतरांगांमध्ये कुठेतरी असावा असा अंदाज आहे. त्यामुळे झाग्रोस पर्वतरांगांसारख्या कठीण भागात जगण्यासाठी या कीटमध्ये 3 ते 7 दिवस पुरेल इतकं ‘हाय-कॅलरी’ अन्न आणि जखमा गोठवणारे ‘टर्निकेट्स’ आणि पाण्याची पाकिटे या सर्व्हायव्हल किटमध्ये असतात. त्याशिवाय यामध्ये शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यास थर्मल ब्लँकेट्स, पावसापासून रक्षण व्हावे यासाठी पोंचो दिलेले असतात. Inside story of US Air Force Survival System
सागरी लँडिंगसाठी विशेष उपकरणे
जर पायलट जमीनीऐवजी पाण्यात पडला, तर या किटमध्ये एक हवा भरता येणारी जीवनरक्षक नौका आणि ‘सी डाय’ यांचा समावेश आहे. ‘सी डाय’ हे एक असे रसायन आहे जे पाण्यात चमकदार रंग पसरवते, ज्यामुळे पायलट हवेतून दिसू शकतो जे सागरी बचाव कार्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
शेवटचा प्रहार ‘The Survival Rifle’ म्हणजेच आत्मसंरक्षण
शत्रूच्या प्रदेशात वैमानिकाचे पहिले प्राधान्य हे नेहमी ‘स्वतःला लपवून ठेवणे’ आणि शत्रूच्या तावडीतून सुटणे हेच असते. मात्र, जर परिस्थिती हाताबाहेर गेली आणि समोरासमोर सामना करण्याची वेळ आलीच, तर वैमानिकाला स्वसंरक्षणासाठी शस्त्रांनी सज्ज ठेवले जाते. पूर्वी या किटमध्ये केवळ लहान पिस्तुलांचा समावेश असायचा, परंतु आताच्या आधुनिक किटमध्ये ‘कॉम्पॅक्ट सर्व्हायव्हल रायफल्स’ देण्यात आल्या आहेत. या रायफल्सचे वैशिष्ट्य म्हणजे गरजेनुसार त्यांचे सुटे भाग जोडून त्या त्वरित तयार करता येतात. मात्र, शत्रूवर गोळीबार करणे हा वैमानिकासाठी नेहमीच शेवटचा पर्याय मानला जातो, कारण शस्त्र चालवल्यामुळे वैमानिकाचे नेमके ठिकाण शत्रू सैन्याला समजण्याचा धोका असतो.
Iran Vs America युद्ध भडकणार; जिवंत रहायचं असेल तर 48 तासांत देश सोडा! अमेरिकेने थेट हुकूमच दिला…
‘सर्व्हायव्हल सिस्टम’ ची निर्मिती अत्यंत विचारपूर्वक
अमेरिकन हवाई दलाची ‘सर्व्हायव्हल सिस्टम’ अत्यंत विचारपूर्वक आणि ‘मोड्युलर’ म्हणजेच गरजेनुसार बदलता येईल अशी बनवली आहे. पायलट ज्या भागात मोहिमेवर जाणार आहे, तिथल्या वातावरणानुसार या किटमध्ये बदल केले जातात. म्हणजे जर, मोहीम अतिशय थंड किंवा बर्फाळ भागात असेल, तर किटमध्ये शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी अतिरिक्त थंडीरोधक साहित्याचा समावेश केला जातो. तर, वाळवंटातील मोहिमांसाठी पाणी साठवण्याची जास्तीची साधने आणि प्रखर सूर्यप्रकाशापासून संरक्षण देणाऱ्या उपकरणांवर भर दिला जातो. समुद्री मोहीमांसाठी या कीटमध्ये समुद्रात तरंगण्यासाठी लागणारी विशेष साधने आणि लाइफ जॅकेट्सचा समावेश असतो.
शत्रूच्या मुलखातही अमेरिकन वैमानिक ‘एकटा’ नाही
इराणच्या भूमित कोसळलेल्या अमेरिकेच्या F-15E पायलटचा कसून शोध घेतला जात आहे. अमेरिकन हवाई दलाची ही प्रगत यंत्रणा, कठोर ‘SERE’ प्रशिक्षण आणि चोख रणनीती यांचा एकत्रित मिलाफ वैमानिकाच्या जगण्याची शक्यता कित्येक पटीने वाढवत असून, बचाव पथक येईपर्यंत स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी लागणारे सर्व बळ या सर्व्हायव्हल किटमध्ये दिलेले आहे. त्यामुळे शत्रूच्या मुलखातही विमान कोसळून अमेरिकन पायलट एकटा नाहीये.