धक्कादायक Iceland मध्ये भूकंपाचं रेकॉर्ड! 14 तासांत जाणवले एक हजार धक्के
Iceland : आईसलॅंडच्या (Iceland) च्या एका प्रांतामध्ये 14 तासांच्या आत तब्बल एक हजार भूकंपाचे हादर बसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर येथील सरकारने आपतकालीन परिस्थितीची घोषणा केली आहे. तसं पाहिलं तर जगभरात भूकंपाचे धक्के जाणवत असतात. मात्र आईसलॅंडमध्ये झालेल्या या भूकंपाने रेकॉर्ड केले आहे.
Praveen Tarde: प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त बायकोने शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाल्या…
आईसलॅंड पर्यटनाच्या दृष्टीने एक आकर्षक आणि प्रसिद्ध देश आहे. त्यामुळे या दुर्घटनेनंतर आता 16 नोव्हेंबरपर्यंत येथील पर्यटन बंद करण्यात आलं आहे. देशातील रेक्झनेस प्रायद्विप क्षेत्रामध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले. ज्याची तीव्रता 4 रिश्टर स्केलच्या आसपास होती. अद्याप या भूकंपामध्ये किती प्रमाणात वित्त आणि जिवित हानी झाली याचा आकडा समोर आलेला नाही.
Nashik News : पाण्याचं भांडण थेट कोर्टात! जायकवाडीला पाणी देण्याविरोधात याचिका
आईसलॅंडमध्ये नेहमी ज्वालामुखीच्या घटना घडत असतात. येथे अनेक लाव्हा आणि शंकू आहेत. तसेच देशाच्या ज्या रेक्झनेस प्रायद्विप क्षेत्रामध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले. तो अटलांटिका समुद्राच्या जवळ आहे. त्यामुळे येथे ज्वालामुखी सक्रिय असण्याचा धोका जास्त आहे. अनेक डोंगर दऱ्या आहेत ज्यामुळे या भूकंपांनंतर ज्वालामुखीच्या फुटण्याचा धोका देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान ज्या भागात हे भूकंपाचे धक्के जाणवले त्या भागात 4 हजार घरं आहेत. शुक्रवार पासून अशा प्रकारचे धक्के या भागात जाणवत आहेत. त्याचबरोबर या भागाात ब्लू लगून देखील आहे. म्हणजे असा निळा समुद्र जो मानवनिर्मित आहे. त्याला जगातील काही आश्चर्यापैकी एक मानले जाते. त्यासाठी लोक दरवर्षी त्याला भेट देतात.