Imran Khan : मोठी दुर्घटना टळली! ताफ्यातील गाड्यांचा अपघात; इम्रान खान थोडक्यात बचावले

  • Written By: Published:
Imran Khan : मोठी दुर्घटना टळली! ताफ्यातील गाड्यांचा अपघात; इम्रान खान थोडक्यात बचावले

Imran Khan Convoy Car Accident :  पाकिस्तानमध्ये एकीकडे इम्रान खानच्या अटकेवरून वातावरण तापलेले असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. इम्रान खान यांना न्यायालयात नेले जात असताना ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला आहे. ताफ्यातील गाड्या एकमेकांवर धडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात असून, या अपघातात इम्रान खान थोडक्यात बचावले आहेत.

या अपघातात तीन जण जखमी झाले असून, इम्रान खान सुरक्षित असल्याचे तसेच त्यांच्या वाहनाचे कोणतेही नुकसान झालेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने दाखल केलेल्या तक्रारीशी संबंधित प्रकरणात न्यायालयात हजर राहण्यासाठी इम्रान खान निघाले होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यातील काही गाड्या एकमेकांवर धडकल्या.

Jayant Patil : वर्ष संपेपर्यंत शिंदे गटाचं…; जयंत पाटलांच्या विधानानं शिंदे गटाची धाकधूक वाढली

दरम्यान, “माझ्या सर्व खटल्यांमध्ये जामीन मिळाल्यानंतरही सरकार मला अटक करू इच्छित आहे हे आता स्पष्ट झाले आहे. त्यांचा हेतू मला माहीती असूनही, मी इस्लामाबादमधील न्यायालयात जात आहे. कारण माझा कायद्यावर विश्वास असल्याचे ट्वीट इम्रान खान यांनी या घटनेनंतर केले आहे.

पाच भाषांमध्ये गाणं गाणाऱ्या ‘त्या’ अवलियाचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक

तर, दुसरीकेड पाकिस्तानी मीडियानुसार, इम्रान खानच्या तहरीक-ए-इन्साफने (PTI) शेहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सर्व राजकीय पक्षांसोबत बैठकीसाठी तारीख आणि ठिकाण निश्चित करण्यास सांगितले आहे. देशाला पुढे नेण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना एकत्र बसावे लागेल असे इम्रान खान म्हणाले होते. मात्र, इम्रान खान यांच्या पक्षाला दोनदा चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आले होते, परंतु पक्षाने चर्चा केली नाही. इतर सर्व नेते नेहमी चर्चेचा अवलंब करत असताना पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने याबाबत सकारात्मक उत्तर न दिल्याचा इतिहास असल्याचे पीटीआयचे नेते फवाद चौधरी म्हणाले.  

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube